Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अजित पवारांच्या अडचणी वाढणार? निवडणूक आयोगाने घेतली 'त्या' वक्तव्याची दखल, दिले चौकशीचे आदेश

अजित पवारांच्या अडचणी वाढणार? 
निवडणूक आयोगाने घेतली 'त्या' वक्तव्याची दखल, दिले चौकशीचे आदेश



मुंबई : खरा पंचनामा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी एका प्रचारसभेत बोलताना मतदारांना प्रलोभन दाखवणारे वक्तव्य केले होते, त्या वक्तव्याची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे, त्याचबरोबर यासंबधी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

काय लागेल को निधी द्यायला सहकार्य करू, पाहिजे तेवढा निधी देतो, पण मशीनमध्ये बटण दाबा कचाकचा, म्हणजे मलाही बरे वाटेल. नाही तर माझा हात आखडता होईल, असं वक्तव्य अजित पवार यांनी इंदापूरमध्ये डॉक्टर आणि वकिलांच्या परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या वक्तव्याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करत गंभीर दखल घ्यावी अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर विरोधकांनी देखील याबाबत तक्रार दिली होती, त्यानंतर राज्या निवडणूक आयोगाने पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना अजित पवारांच्या वक्तव्याची चौकशी करण्याचे आणि अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबतचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहेत.

आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, हा ध चा मा करण्याचा प्रकार आहे. मी गमतीने ते वक्तव्य केलं होतं, मी नेहमी विचारपुर्वक बोलतो आणि आचारसंहितेची खबरदारी घेतो.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.