Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीचा पदार्फाश

गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीचा पदार्फाश



सांगली : खरा पंचनामा

गोवंशाची कत्तलीसाठी किंवा विक्रीसाठी त्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीचा पदार्फाश करण्यात आला. याप्रकरणी ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे. या टोळीच्या ताब्यातून ११ बैलांची सुटका करण्यात आली तर एक ट्रक असा १६.३० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कासेगावजवळील मालखेड फाटा येथील तपासणी नाक्यावर कासेगाव पोलिसांनी ही कारवाई केली. 

ट्रक चालक दुर्गेश शंकर जाधव (वय २३, रा. पेठनाका, ता. वाळवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. एक अल्पवयीन, ट्रकचा मालक सचिन निवास साळुंखे, रामहरी तुळशीराम मुंडे (वय ३८), अशोक शहाजी शिरसाट (वय ३२), रामधन बिभीषण गोपाळघरे (वय ३८), अशोक कारभारी देठे (वय ३६, सर्व रा. निवडुंगवाडी, जि. बीड) अशी अन्य संशयितांची नावे आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कासेगावजवळील मालखेड येथे पोलिसांनी तपासणी नाका उभारला आहे. 

मंगळवारी रात्री एक ट्रक (एमएच ११ सीएच ८९०९) या तपासणी नाक्यावरून जात होता. त्यावेळी तेथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी तो ट्रक अडवून त्याची तपासणी केली. त्यावेळी त्यामध्ये ११ बैल दाटीवाटीने भरलेले आढळून आले. याबाबत ट्रक चालक दुर्गेश जाधव याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच त्याच्याकडे जनावरे वाहतूक परवानही नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून अन्य संशयितांची नावेही स्पष्ट झाली. त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

इस्लामपूरचे पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने कासेगावचे सहायक निरीक्षक भालचंद्र देशमुख, उपनिरीक्षक राहुल वाघमारे, सचिन पाटील, संग्राम कुंभार, सचिन चव्हाण, संभाजी पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.