Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चंद्रकांत पाटलांसमोरच भाजप कार्यकर्त्याची शेतकऱ्याला धक्काबुक्की

चंद्रकांत पाटलांसमोरच भाजप कार्यकर्त्याची शेतकऱ्याला धक्काबुक्की



सोलापूर : खरा पंचनामा

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्या समोरच शेतकऱ्यास भाजपा कार्यकर्त्याने अरेरावी करत धक्काबुक्की केली. माढा लोकसभा मतदार संघाच्या टेंभुर्णी येथील पदाधिकारी बैठकीत शेतकऱ्याने प्रश्न विचारला म्हणून भाजपा कार्यकर्त्यांची अरेरावी दिसून आली. या घटनेनंतर भाजपविरोधात उपस्थित शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

भाजपाच्या पदाधिकारी बैठकीत केंद्राच्या रासायनिक खतांमुळे माझे नुकसान झाले. माझे नुकसान भरून निघाले नाही. अशी कैफियत संपतराव काळे या शेतकऱ्यांने मांडली. विशेष म्हणजे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे भाषण सुरू असताना. शेतकरी आपल्या तक्रारीचा पाढा वाचत होता. यानंतर चंद्रकांत पाटील यांनीही संबंधित शेतकऱ्याची कैफियत ऐकली. भाषण झाल्यावर खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि पालकमंत्री पाटील यांनी संपतराव काळे या शेतकऱ्यास जवळ बोलवून त्यांच्याशी चर्चा केली. मात्र, शेतकरी संतप्त झाला. यानंतर कार्यकर्ते आणि पोलिसांनी शेतकऱ्यास अरेरावी करत धक्काबुक्की केली. यामध्ये या शेतकऱ्यास हुसकावून लावण्याचा प्रयत्न देखील झाला. शेतकरी संपत काळे यांनी माझा पालकमंत्री व खासदार यांच्यावर रोष नसला तरी माझे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी मला सहकार्य करावे असे म्हणत झालेल्या गोंधळावर पडदा टाकला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.