Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

धारदार तलवार, कोयता घेऊन फिरणाऱ्या दोघांना अटक राजारामपुरी पोलिसांची कारवाई

धारदार तलवार, कोयता घेऊन फिरणाऱ्या दोघांना अटक
राजारामपुरी पोलिसांची कारवाई



कोल्हापूर : खरा पंचनामा

कोल्हापुरातील शेंडा पार्क परिसरात धारदार तलवार, कोयता घेऊन फिरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून हत्यारे जप्त करण्यात आल्याची माहिती राजारामपुरीचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिली. 


धीरज यशवंत गायकवाड (वय २२, रा. कळंबा, मूळ रा. टिक्केवाडी, भुदरगड), शुभम शिवाजी पाटील (वय २२, रा. कावणे, ता. करवीर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना निरीक्षक तनपुरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या आहेत. 


पथक पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना शेंडा पार्क परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन तरूण संशयास्पदरित्या थांबल्याचे पथकाला आढळून आले. पथकाने दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतल्यावर त्यांच्याकडे तलवार आणि कोयता सापडला. हत्यारे जप्त करून दोघांनाही अटक करण्यात आली. 

कोल्हापूर शहरचे पोलिस उपअधीक्षक अजित टिके, राजारामपुरीचे निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक युवराज जाधव, समीर शेख, सुशांत तळप, विशाल शिरगावकर, संदीप सावंत, युक्ती ठोंबरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.