Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कुपवाडच्या तरुणाचा थरारक पाठलाग करत सपासप वार करून निर्घ्रुण खून उदगाव येथील घटना, पळून जाणारे कुपवाडचे चौघे ताब्यात

कुपवाडच्या तरुणाचा थरारक पाठलाग करत सपासप वार करून निर्घ्रुण खून
उदगाव येथील घटना, पळून जाणारे कुपवाडचे चौघे ताब्यातजयसिंगपूर : खरा पंचनामा

कुपवाडच्या तरुणाचा सांगलीतून थरारक पाठलाग करत डोक्यात, छातीवर, हातावर धारदार हत्याराने वार करत निर्घ्रुणपने खून करण्यात आला. गुरुवारी दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान ही घटना घडली. हल्ल्यानंतर पळून जाणाऱ्या चौघाना जयसिंगपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

यातील मृत आणि हल्लेखोरांची नावे अद्याप स्पष्ट झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. कुपवाडचा एक तरुण बुलेटवरुन जयसिंगपूरच्या दिशेने निघाला होता. सांगलीपासून काही तरुण त्याचा पाठलाग करत होते. उदगाव येथील एका पेट्रोल पंपासमोर आल्यावर मृत तरुणाला काहीजन पाठलाग करत असल्याचे लक्षात आले. 

त्यानंतर तो बुलेट रस्त्यावर सोडून एका फैब्रिकेशनच्या दुकानात शिरून लपून बसला. पाठलाग करणाऱ्या तरुणानी त्याला शोधून ओढ़त रस्त्यावर आणले. तेथे त्याच्यावर धारदार हत्यारानी सपासप वार केले. है हल्ला इतका भीषण होता की, मृताच्या हाताची बोटे तुटून पडली. तो तरुण मृत झाल्याची खात्री पटल्यानंतर हलेखोर जयसिंगपूरच्या दिशेने पळून गेले. घटना पाहणाऱ्या लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली.

जयसिंगपूरचे पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाने रोहित डावाळे, अमोल अवघडे यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी संशयित चौघाना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे कसुन चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.