Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीच्या पोलीसाला हायकोर्टाचा दिलासा; सेवेतून निलंबनाचे आदेश रद्द

सांगलीच्या पोलीसाला हायकोर्टाचा दिलासा; सेवेतून निलंबनाचे आदेश रद्द



मुंबई : खरा पंचनामा

सेवेतून निलंबित न करण्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे आदेश कायम करत उच्च न्यायालयाने पोलीस कर्मचारी शिवानंद बोबडे यांना दिलासा दिला आहे. न्या. अतुल चांदुरकर व न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने दोन आठवडय़ात बोबडे यांना सेवेत घ्या, असे आदेश पोलीस खात्याला दिले.

पोलिस कर्मचारी शिवानंद बोबडे यांनी ही याचिका केली होती. बोबडे यांची खातेनिहाय चौकशी झाली. 2 जुलै 2021 रोजी सांगलीचे पोलीस अधीक्षक यांनी बोबडे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. याविरोधात त्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे अपील केले. विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी बोबडे यांचे निलंबन रद्द केले. बोबडे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या निदर्शनास आणण्यात आले. त्याची दखल घेत विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी आधीचा आदेश रद्द करत बोबडे यांचे निलंबन कायम केले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.