Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शैक्षणिक साहित्य वाटपासह गावात सुरू केला टॅंकर सांगली ग्रामीण पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कवलापूरकरांनी ठेवला आदर्श

शैक्षणिक साहित्य वाटपासह गावात सुरू केला टॅंकर
सांगली ग्रामीण पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कवलापूरकरांनी ठेवला आदर्शसांगली : खरा पंचनामा

भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त मिरवणुकीच्या वायफळ खचार्सह डॉल्बीला फाटा देत अनाथ मुलांना दत्तक घेत गरीब मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शिवाय गावातील पाणी टंचाई असलेल्या भागात जयंती समितीतर्फे मोफत पाण्याचे टॅंकरही सुरू करण्यात आले आहेत. सांगली ग्रामीण पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कवलापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती अनोखे उपक्रम राबवले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिस ठाणे हद्दीतील गावांतील जयंती समित्यांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी सांगली ग्रामीणचे प्रभारी पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी सर्व जयंती मंडळांना मिरवणुकीचा वायफळ खर्च न करता अगर डॉल्बी न लावता सामाजिक उपक्रम राबवणे बाबत आवाहन केले होते. त्याला कवलापूर येथील जयंती उत्सव समितीने चांगलाच प्रतिसाद दिला. 

मिरवणुकीचा आणि डॉल्बीच्या खर्चाला फाटा देत सामाजिक उपक्रम राबवल्याबद्दल सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याच्यावतीने पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, निरीक्षक राजेश रामाघरे यांच्याहस्ते कवलापूर येथील समितीचे अध्यक्ष वॉल्टर विजयानंद खाडे, उपाध्यक्ष सचिन सिकंदर कांबळे, सतीश दिनकर खाडे व महादेव दशरथ खाडे यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्राचे पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपअधीक्षक जाधव, निरीक्षक रामाघरे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हददीतील इतर गावांनी देखील यापुढे सण वार उत्सव तसेच सर्व महापुरुषांचे जयंती निमित्त सामाजिक उपक्रम राबवावेत असे आवाहन केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.