Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अमित शाह यांच्या ऑफिसला लागली आग, गृह खात्याचे महत्वपूर्ण कागदपत्रे जळाल्याची शक्यता?

अमित शाह यांच्या ऑफिसला लागली आग, गृह खात्याचे महत्वपूर्ण कागदपत्रे जळाल्याची शक्यता?



नवी दिल्ली : खरा पंचनामा

सर्वच पक्षांचे नेते सध्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. या व्यस्ततेत केंद्रीय गृहमंत्रालयाच्या नॉर्थ ब्लॉक ऑफिसमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी सकाळी ही आग लागली.

यावेळी माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. यावेळी कार्यालयात ठेवलेले संगणक आणि अनेक कागदपत्रेही जळून खाक झाली. अमित शहा यांनाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे. आगीची माहिती मिळताच अनेक वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले.

गृहमंत्रालयात दुसऱ्या मजल्यावर आगीच्या घटनेनंतर गोंधळ उडाला. आसपासच्या लोकांच्या आणि रक्षकांच्या माहितीवरून पोलीस आणि अग्निशमन दलही घटनास्थळी पोहोचले. गार्डने कार्यालयातून काही कागदपत्रे काढण्याचा प्रयत्न केला मात्र काळा धूर पसरल्याने त्यालाही आत जाता आले नाही. तासाभराच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले. 

गृह मंत्रालयाच्या कार्यालयाला आग लागल्याची घटना संपूर्ण परिसरात वेगाने पसरली. मात्र, या घटनेत जीवित वा वित्तहानी झाली नाही. तरीही कार्यालयात ठेवलेले संगणक, झेरॉक्स मशीन व काही कागदपत्रे जळून खाक झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या निवडणूक दौऱ्यात व्यस्त आहेत. मात्र, त्यांना आगीच्या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

गृह मंत्रालयाच्या कार्यालयात मंगळवारी आग कशी लागली याचा तपास सध्या सुरू आहे. मात्र, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा कर्मचाऱ्यांचा अंदाज आहे. आग विझवल्यानंतर गृह मंत्रालयाचे कर्मचारी बराच वेळ कार्यालयाची साफसफाई करण्यात व्यस्त होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.