Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सलमान खानच्या 'गॅलेक्सी' घराबाहेर गोळीबार

सलमान खानच्या 'गॅलेक्सी' घराबाहेर गोळीबार



मुंबई : खरा पंचनामा

अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथिल घराबाहेर आज पहाटे दोन अज्ञातांनी गोळीबार केला. त्यानंतर हे दोन्ही आरोपी फरार झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील वांद्रे येथिल घराबाहेर आज पहाटे गोळीबाराचा आवाज आला, असे पोलिसांनी सांगितले.

आज पहाटे 5 वाजता मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी हवेत अनेक राऊंड गोळीबार करून घटनास्थळावरून पळ काढला. मुंबई पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर आता क्राइम ब्रँचची टीमही घटनास्थळी हजर असून गोळ्यांच्या खुणा तपासत आहेत.

अभिनेता सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. गेल्या वर्षी पंजाबी गायक सिद्धू मूस वालाच्या हत्येनंतर सलमानला गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई या गुंडांकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या.

सलमानला धमकीचा ई-मेल आला होता, त्यानंतर मुंबई पोलिसांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.