बियर कंपनीने बुडवला ५७ कोटींचा राज्य सरकारचा कर
राज्य जीएसटीकडून कंपनीवर गुन्हा दाखल
पुणे : खरा पंचनामा
पुण्यातील आलिशान क्लबमध्ये बियर तयार करुन त्याची विक्री करणाऱ्या कंपनीने राज्य शासनाचा तब्बल ५७ कोटी ४८ लाख ६९ रुपयांचा कर बुडवल्या प्रकरणी राज्यकर विभागाने या कंपनीवर कारवाई करत २ संचालकांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सदर कंपनीने महाराष्ट्र मूल्यवर्धीत कर कायदा २००२ च्या कलम २० चे उल्लंघन केले. त्यांनी विवरणपत्र सादर केले नाही. याबाबत जीएसटीकडून कंपनीला वारंवार पत्र व नोटीस देऊन सूचित करण्यात आले होते. राज्य मूल्यवर्धीत कर कायदा २००२ ची प्रलंबित थकबाकी न भरल्याप्रकरणी ब्रुकाष्ट माइक्रो या बिअर कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे. कंपनीच्या कर विवरणपत्र कर भरल्याचा उल्लेख असला तरी प्रत्यक्षात कर जर ला नसल्याचे तक्रारीत नमुद केले आहे.
हडपसर येथील आलिशान क्लब मध्ये बिअर आणि अन्नपदार्थ विक्रीचेही काम कंपनीमार्फत केले जाते. या कंपनीमार्फत सदर आलिशान क्लब' देखील चालवला जातो. तेथेच बिअर तयार केली जाते, अशीही माहिती आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.