Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भाजपचे दोन आमदार अडचणीत; प्रक्षोभक भाषणाप्रकरणी गुन्हे दाखल

भाजपचे दोन आमदार अडचणीत; प्रक्षोभक भाषणाप्रकरणी गुन्हे दाखल



मुंबई : खरा पंचनामा

भाजपचे आमदार नितीश राणे आणि गीता जैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याचे महाराष्ट्र पोलिसांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. जानेवारीत ठाणे जिल्ह्यात झालेल्या जातीय हिंसाचाराच्या वेळी दोघांनीही आक्षेपार्ह भाषण केल्याचे तपासादरम्यान आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.

न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने गेल्या आठवड्यात संबंधित पोलिस आयुक्तांना या दोन्ही नेत्यांनी आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक भाषणे केली होती का, याची वैयक्तिक पडताळणी करण्यास सांगितले होते.

सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी आज न्यायालयाला सांगितले की, या वर्षी जानेवारी महिन्यात मीरा भाईंदर येथे झालेल्या जातीय हिंसाचाराच्या वेळी राणे आणि जैन यांनी दिलेली भाषणे अपमानास्पद होती, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

वेणेगावकर म्हणाले की, राणेंवर मुंबईतील मालवणी, मानखुर्द आणि घाटकोपर भागातील सभांमध्ये द्वेषपूर्ण भाषणे केल्याचा आरोप आहे. तर, जैन यांच्यावर मीरा भाईदरमधील सभेत द्वेषपूर्ण भाषण केल्याचा आरोप आहे.

सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी पुढे सांगितले की, पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 153A (धर्माच्या आधारावर लोकांमध्ये शत्रुत्व वाढवणे), 504 (चिथावणी देण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.

ते पुढे म्हणाले की, मीरा भाईंदरमध्ये 22 ते 26 जानेवारी दरम्यान उसळलेल्या जातीय हिंसाचाराच्या संदर्भात अन्य व्यक्तींविरुद्ध 13 स्वतंत्र एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे वेणेगावकर यांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.