Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोट्यधीश आहेत, पण या उमेदवारास फडणवीसांनी म्हटले होते फकीर!

कोट्यधीश आहेत, पण या उमेदवारास फडणवीसांनी म्हटले होते फकीर!



परभणी : खरा पंचनामा

लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना उमदेवारी अर्ज दाखल करताना संपत्ती आणि गुन्हे यासंदर्भातील शपथपत्र दाखल करावे लागते. त्या शपथपत्रामुळे कोणावर किती गुन्हे दाखल आहेत, त्याची माहिती समोर येऊ लागली आहे.

तसेच कोणाकडे किती संपत्ती आहे, ती माहिती मिळत आहे. स्वतःला फकीर म्हणणारे महायुतीचे परभणीचे उमेदवार महादेव जानकर यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याची माहिती निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रामधून समोर आली आहे. त्यांच्याकडे सोने-चांदीचे दागिने, जमीन, एफडी, गोल्ड बाँड स्कीममध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांच्याकडे एकूण पाच कोटींची संपत्ती आहे.

महादेव जानकर मूळचे पळसवाडी जिल्हा सातारा जिल्ह्यातील आहेत. त्यांनी शपथपत्रात आपला व्यवसाय शेती हा दर्शविला आहे. जाणकारांच्या नावावर अठरा एकर 14 गुंठे एवढी शेती आहे. त्यांच्याकडे चल आणि अचल दोन्ही मिळून जवळपास पाच कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यामुळे स्वतःला फकीर म्हणणाऱ्या महादेव जानकर यांच्याकडे कोट्यावधी रुपयाची संपत्ती असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

महादेव जानकर यांनी आपले निवडणूक अर्ज भरताना प्रतिज्ञापत्र दिले आहे. त्यात त्यांनी आपले उत्पन्न दाखवले आहे. सन 2022-23 मध्ये त्यांचे उत्पन्न 40 लाख 19 हजार 990 एवढे आहे. तर 2021-22 मध्ये 31 लाख 38 हजार 40 रुपये, 2020-21 मध्ये 27 लाख 40 हजार 750 रुपये, तर 2019-20 मध्ये 31 लाख 77 हजार 942 रुपये आणि 2018-19 मध्ये 26 लाख 26 हजार 639 रुपये एवढे उत्पन्न दर्शविण्यात आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.