Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

प्रेमीयुगुलाला लुटणाऱ्या दोन पोलीसांवर गुन्हा दाखल

प्रेमीयुगुलाला लुटणाऱ्या दोन पोलीसांवर गुन्हा दाखलनागपूर : खरा पंचनामा

एका प्रेमी युगुलाला दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी अडवले. धाकदपट करीत युवकाकडून सोनसाखळी हिसकावली. मात्र प्रेमीयुगलाला लुटणारे हे पोलीस कर्मचारी तोतया नसून ते दोघेही कळमना ठाण्यात हवालदार असल्याची माहिती समोर आली.

संदीप यादव आणि पंकज यादव (दोन्ही, रा. कळमना) अशी या आरोपींची नावे आहेत. १३ मार्चला रात्री नऊच्या सुमारास १९ वर्षीय युवक हा वाठोडा पोलिस ठाणे हद्दीत, जबलपूर हायवे रोडवरील एफएलडी हॉटेल समोर कारमध्ये बसून त्याच्या मैत्रिणीसह गप्पा मारत होता. संदीप आणि पंकज यांनी त्यांच्याजवळ जाऊन त्यांना आम्ही पोलिस आहोत, असे सांगून धमकवण्यास सुरवात केली.

या पोलिसांनी तरुणाला पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबतची धमकीही दिली. या धमकीला घाबरत युवकाने गळ्यातील सोनसाखळी काढून पोलिसांना दिली. तसेच या घटनेची कुठेही वाच्यता न करण्यास ठणकावले. घडलेल्या घटनेवरून युवकाने वाठोडा पोलिस ठाणे गाठले. तसेच तक्रार दाखल केली.

याप्रकरणी पोलिसांनी ३९२ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली. युवकाला लुटणारे ते दोघेही कळमना पोलिस ठाण्यात कर्मचारी असल्याची माहिती समोर आली. लवकरच दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पंकज व संदीप यादव हे दोघे रिंगरोडवर निर्जनस्थळी बसलेल्या प्रेमीयुगुलांना लुटत होते. असे काही प्रकार घडल्यास पीडितांनी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्याकडे कार्यालयीन वेळेत तक्रार करावी, असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.