Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'छत्तीसगडमध्ये मद्य घोटाळा झालाच नाही'

'छत्तीसगडमध्ये मद्य घोटाळा झालाच नाही'नवी दिल्ली : खरा पंचनामा

छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकारच्या काळात मद्य धोरण घोटाळ्यात कुठल्याही प्रकारचे मनीलॉन्ड्रीग झाले नसल्याचा निर्वाळा बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निर्णयामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे.

छत्तीसगडमधील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने प्रिवेंशन आफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट (पीएमएलए) या विशेष न्यायालयात खटला दाखल केला होता. राजकीय नेते, खासगी व्यक्ती आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या सिंडिकेटने २०१२ ते २०२२ याकाळात अवैधरित्या मद्य विक्री करून २ हजार १६१ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा ठपका ईडीने ठेवला होता. माजी आयएएस अधिकारी अनिल टुटेजा आणि त्यांचे सुपुत्र यश टुटेजा यांनी या सिंडिकेटमधील मुख्य सूत्रधार असल्याचे ईडीने म्हटले होते. या खटल्याच्या सुनावणीत न्यायमूर्ती ए. एस. ओका यांच्या खंडपीठाने ईडीने चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, छत्तीसगडमधील माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या सरकारला राजकीयदृष्ट्या बदनाम करण्यासाठी हा मद्य घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर आयकर विभागाच्या धाडी घालून ईडीने गुन्हा दाखल केला होता. राज्यात निवडणूक आल्याचे पाहून ही कारवाई झाल्याचे त्यांनी सांगितले. 

काँग्रेसचे प्रसारमाध्यम प्रमुख जयराम रमेश यांनी सुद्धा भाजपवर हल्लाबोल केला आहे. ईडी ही भाजपचीच प्रमुख संघटना असल्याची टीका त्यांनी केली आहे. विरोधकांना त्रास देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाचा राजकीय वापर करीत असल्याचा आरोप जयराम रमेश यांनी केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.