Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'अंधेरी आरटीओ'मध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे १०० हून अधिक वाहनांची नोंदणी?

'अंधेरी आरटीओ'मध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे १०० हून अधिक वाहनांची नोंदणी?



मुंबई : खरा पंचनामा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारितील परिवहन विभागातील एक नवा घोटाळा उघडकीस आला आहे. परराज्यातून ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेऊन अंधेरी आरटीओत १०० हून अधिक बस आणि अन्य वाहनांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. तसेच यापैकी बहुतांश वाहनांची मूळ कागदपत्रे गहाळ झाली असून वाहनांच्या नोंदणीसाठी वापरण्यात येणाऱ्या 'वाहन' या संगणकीय यंत्रणेवरसुद्धा ती उपलब्ध नाहीत, असे समजते.

याआधी वाशी आरटीओने काही बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी झालेली पाच-सहा बस पकडून सानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर वसई आरटीओमध्ये परराज्यातून आलेल्या सुमारे ६० बस आणि ट्रक यांची बोगस नोंदणी झाल्याचे परिवहन विभागाच्या तपासात उघडकीस आले होते. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या दोन्ही प्रकरणाचा तपास पोलीस करीत असून त्याबाबत काही ठोस कारवाई होण्याआधीच अंधेरी आरटीओमधील मोठा घोटाळा उघडकीस आला आहे.

'अंधेरी आरटीओ'त परराज्यातून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन आलेल्या जवळपास १२५ बस आणि ट्रकची नोंदणी झाल्याचे बोलले जाते. या वाहनांची महाराष्ट्रातील इतर आरटीओमध्येही नोंदणी केल्याचे समजते.

आरटीओतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी आरटीओतील काम करणाऱ्या कारकुनाला आरटीओ अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे आणि त्यांचे उत्तर आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. यापैकी एका कारकुनाने ८० हून अधिक बसची नोंदणी बनावट पद्धतीने केली असल्याचे आरटीओ प्रशासनाच्या तपासात उघडकीस आल्याचे समजते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.