कल्याण लोकसभेतील सस्पेन्स संपला, देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला उमेदवार
मुंबई : खरा पंचनामा
गेल्या काही दिवसांपासून कल्याणमधील महायुतीचा उमेदवार कोण असणार? ही चर्चा सुरु होती. भाजप आणि शिवसेनेत वाद सुरु होता. शिवसेना कल्याण लोकसभेवरुन आपला दावा सोडण्यास तयार होत नव्हती.
स्थानिक भाजप कार्यकर्ते विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांना मदत करण्यास तयार नव्हते. यामुळे अजूनही कल्याण लोकसभेचा निर्णय जाहीर झाला नव्हता. अखेर कल्याणधील सस्पेन्स संपला आहे. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवार जाहीर केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे आता कल्याणमध्ये दुहेरी लढत होणार आहे. ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर राणे आणि महायुतीचे श्रीकांत शिंदे यांच्यात लढत होणार आहे.
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीत संपूर्ण जागा वाटप अजूनही झालेले नाही. तिन्ही पक्षांत दिल्ली आणि मुंबईत चर्चाच्या अनेक फेऱ्या झाल्या. त्यानंतर कल्याण, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे आणि सिंधुदुर्गचा निर्णय अद्यापही जाहीर झालेले नाही. परंतु आता कल्याणमधील वादावर पडदा पडला आहे. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे हेच उमेदवार असणार आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.