Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मिरजेत आयपीएलवर सट्टा घेणाऱ्याला अटक ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई

मिरजेत आयपीएलवर सट्टा घेणाऱ्याला अटक
३३ हजारांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा घेणाऱ्याला अटक करण्यात आली. मिरजेतील नागोबा कट्टा, शनिवार पेठ येथे कारवाई करत ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.  

रमजान जब्बार सतारमेकर (वय ३५, रा. शनिवार पेठ, मिरज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर कारवाई करण्यासाठी निरीक्षक श्री. शिंदे यांनी सहायक पोलिस निरीक्षक पंकज पवार यांचे एक विशेष पथक तयार केले होते. पथक अवैध व्यवसायाची माहिती घेत असताना मिरजेतील शनिवार पेठ येथे एकजण मोबाईलवर आयपीएलच्या क्रिकेट मॅचवर सट्टा घेत असल्याची माहिती पथकाला मिळाली. 

पथकाने मिरजेतील शनिवार पेठ परिसरात सापळा रचून सट्टा घेताना सतारमेकर याला रंगेहात पकडले. त्याच्याकडून एक मोबाईल, रोकड असा ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याला मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक पंकज पवार, संजय कांबळे, संकेत मगदूम, बाबासाहेब माने आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.