सांगलीमध्ये महाविकास आघाडीचे गणित बिघडण्याची चिन्ह?
विशाल पाटलांचे बंधू माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील प्रकाश आंबडेकरांच्या भेटीला
अकोला : खरा पंचनामा
सांगलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांची उमेदवारी कायम ठेवली असली तरी सांगलीमध्ये महाविकास आघाडीचे गणित बिघडण्याची चिन्ह आहेत. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार भूमिकेत असलेल्या काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्यासाठी आता बंधू माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी आज बुधवारी सकाळीच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने सांगलीच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे विशाल पाटील आता वंचितच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
प्रकाश आंबेडकर आता काय निर्णय घेतात? याकडे सुद्धा लक्ष असेल. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. काँग्रेसने आधीच ठरवलं पाहिजे की महाराष्ट्रात त्यांना आपला अस्तित्व ठेवायचे की नाही? अशी विचारणा आंबेडकर यांनी केली आहे. दरम्यान सांगलीमध्ये शिवसेनेत ताकद नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की आज सकाळी पाटील मला भेटून गेले आहेत. त्यामुळे पुढील निर्णय लवकरच घेऊ. सध्या कुठलाही आग्रह केलेला नाही किंवा कुठलीही सजेशन दिलं नसल्याचे आंबेडकर म्हणाले.
माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांनी अकोल्यात प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. आंबेडकरांच्या अकोल्यातील 'यशवंत भवन' या निवासस्थानी उभय नेत्यांची भेट झाली. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी विशाल पाटलांनी उमेदवारी दाखल करावी, असा सल्ला दिला आहे. यानंत निर्णय घेणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. महाविकास आघाडीत सांगलीची जागा ठाकरे गटाला देण्याचा निर्णय झाल्याने सांगली काँग्रेसमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. प्रतीक पाटील आंबेडकरांना भेटल्याने मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.