Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जास्त वीज बिलामुळे महिलेवर हल्ला; जखमी महिलेचा मृत्यू सुपा पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या

जास्त वीज बिलामुळे महिलेवर हल्ला; जखमी महिलेचा मृत्यू 
सुपा पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या संभाजी पुरीगोसावी
बारामती : खरा पंचनामा

वीजबिल जास्त का आलं म्हणून जाब विचारण्यासाठी आलेल्या एका विकृत मानसिकतेच्या तरुणाने एका 34 वर्षीय महिला वीज कर्मचाऱ्यावर  कोयत्याने वार करुन तिचा खून केल्याची घटना घडली आहे. बारामती तालुक्यांतील मोरगांव येथे बुधवारी सकाळी ११:१५ वाजेच्या सुमारांस ही घटना घडली. याप्रकरणी सुपा पोलिसांनी संशयितास अटक केली आहे.

अवघ्या ५७० रुपयांच्या बिलासाठी आईची हकनाक हत्या झाल्याने यामध्ये एक वर्षाचं बाळ पोरकं झालं आहे. मुळच्या लातूर शहरांतील रहिवाशी असलेल्या सौ. रिंकू गोविंदराव बनसोडे ह्या दहा वर्षापूर्वी २०१३ मध्ये महावितरणच्या सेवेत दाखल झाल्या होत्या. गेल्या १० वर्षापासून त्या मोरगांव येथेच कार्यरत होत्या. नोकरीनंतर रिंकू बनसोडे यांचा विवाह झाला. त्यांना एक वर्षाचा मुलगा आहे. दहा दिवसांची सुटी संपल्यानंतर त्या मोरगाव कार्यालयात कामावर रुजू झाल्या.

बुधवारी २४ एप्रिल रोजी सकाळी ११:१५च्या सुमारांस रिंकू बनसोडे या मोरेगांव येथील कार्यालयात एकट्याच होत्या. यादरम्यान जणू काळ बनून हल्ला करण्यासाठी संपूर्ण तयारीनिशी आलेल्या आरोपी अभिजीत पोटे या व्यक्तीने रिंकू यांना वीजबील जास्त आल्याचा जाब विचारला. 

या विकृत मानसिकतेच्या व्यक्तीने रिंकू यांच्या हातापायावर तोंडावर एकामागोमाग एक असे जवळपास १६ वार केले. काही कळायच्या आतच रिंकू रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. रिंकू यांना मोरगांव येथे प्रथमोपचार केल्यावर त्यांना तातडीने पुण्यातील सह्याद्री रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं. पण दुर्दैवाने उपचारांदरम्यान त्यांचे दुपारी ३ वाजेच्या सुमारांस मृत्यू झाला. या घटनेचा कर्मचाऱ्यांसह सर्वच स्तरांतून निषेध व्यक्त करण्यात आला. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची सुत्रे वेगाने फिरवून माथेफिरू हल्लेखोर अभिजित पोटे या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. 

बारामती विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुदर्शन राठोड, सुपा पोलीस ठाण्याचे स.पो.नि. नवनाथ पाटील, सहा. पोलीस निरीक्षक जिनेश कोळी, नवनाथ पाटील यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.