Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अभिनेत्री लैला खान हत्या प्रकरणात सावत्र पित्यास फाशीची शिक्षा 14 वर्षांनी निकाल; सांगलीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोरे यांची महत्वाची भूमिका

अभिनेत्री लैला खान हत्या प्रकरणात सावत्र पित्यास फाशीची शिक्षा
14 वर्षांनी निकाल; सांगलीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोरे यांची महत्वाची भूमिका



मुंबई : खरा पंचनामा

मुंबई जिल्हा न्यायालयाने अभिनेत्री लैला खान आणि त्याच्या परिवाराच्या हत्या प्रकरणाचा निकाल दिला आहे. या प्रकरणात लैला खान हिच्या सावत्र पिता परवेझ टाक याला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला न्यायालयाने परवेझ टाकला खून आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. गेल्या आठवड्यात सरकारी वकील पंकज चव्हाण यांनी या प्रकरणाचे दुर्मिळातील दुर्मिळ असे वर्णन केले होते आणि दोषी परवेझला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. एकाच कुटुंबातील सहा जणांची हत्या करण्यात आली. त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली.

2011 मध्ये मुंबईतील ओशिवारा पोलीस ठाण्यात सहा लोक बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. अनेक महिने हा प्रकार उघड झाला नव्हता. जुलै 2012 मध्ये पोलिसांना इगतपुरीत फार्म हाऊसमध्ये सहा व्यक्तींचे सापळे सापडले. त्यानंतर ऑक्टोंबर 2012 मध्ये लैला खान खून प्रकरणात आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणातील दुसरा आरोपी शकीर हुसैन अजूनही फरार आहे.

लैला खान आणि तिच्या कुटुंबाचे खून प्रकरण 14 वर्षे जुने आहे. फेब्रुवारी 2011 मध्ये लैला, तिची आई आणि चार भावंडांची हत्या परवेझ टाक याने केली होती, त्यानंतर त्यांचे मृतदेह फार्म हाऊसमध्ये पुरला होता. पोलिसांच्या चौकशीत हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. लैलाचे वडील नादिर पटेल यांनी मुंबईतील ओशिवरा पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.

मुंबईतील इगतपुरी येथील बंगल्यातील मालमत्तेवरून परवेझ टाक याचा सेलिनासोबत वाद झाला होता. त्यानंतर त्याने खून केले. टाक याने सर्वप्रथम त्याची पत्नी सेलिनाची हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. त्यानंतर त्याने लैला आणि तिच्या चार भावंडांची हत्या केली. एकाच कुटुंबातील सहा खून झाल्याची घटना काही महिन्यांनंतर उघडकीस झाली. परवेझ टाक याला जम्मू-काश्मीर पोलिसांनी फसवणुकीच्या प्रकरणात अटक केली.

सुरुवातीला टाक दावा करत होता की लैला आणि तिचे कुटुंब दुबईत होते. नंतर त्याने महाराष्ट्रातील इगतपुरीत या लोकांची हत्या केल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांना सांगितले. नंतर त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. टाक यांनी जम्मू-काश्मीरमध्ये वन कंत्राटदार म्हणून काम केले.

सांगलीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोरे यांची महत्वाची भूमिका
या खुनाच्या गुन्ह्याचा तपास तत्कालीन वरीष्ठ पोलिस निरीक्षक दीपक फटांगरे,  पोलिस निरीक्षक ज्योत्स्ना रामस, सहायक निरीक्षक संजय मोरे यांनी तपास केला. यातील निरीक्षक फटांगरे सध्या सेवानिवृत्त झाले असून श्रीमती रामस सध्या पायधुनी विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त म्हणून कायर्रत आहेत. तर सहायक निरीक्षक संजय मोरे हे सध्या सांगली शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी म्हणून कायर्रत आहेत. श्री. मोरे यांनी त्यांच्या सेवाकाळात दोन गुन्ह्यात आरोपींना फाशीची शिक्षा मिळण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.