Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

धक्कादायक : विकत आणलेल्या टरबुजाचा झाला स्फोट

धक्कादायक : विकत आणलेल्या टरबुजाचा झाला स्फोटयवतमाळ : खरा पंचनामा

उन्हाळा आणि टरबूज हे एक सुंदर कॉम्बिनेशन आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच हमखास आठवण येते ती टरबुजांची. आंब्याच्या आधीही टरबुज आठवते. पण हल्ली टरबुजाच्या बाबतीत जे काही ऐकायला येत आहे, ते ऐकून तर टरबूज घेण्याचीच भीती वाटायला लागली आहे.

टरबुजाला लाल रंग येण्यासाठी इंजेक्शन दिलं जातं, त्यातूनच साखरेचं पाणी टाकलं जातं, हे आपण ऐकलं आहे. पण आता तर चक्क त्याचा स्फोट झाल्याची घटना यवतमाळमध्ये घडली. म्हणूनच टरबूज घ्यायचंच असेल तर ते आपल्या नेहमीच्या फळं- भाजी विक्रेत्याकडून घ्या असा सल्ला दिल्ला जात आहे.

यवतमाळ येथील एका रहिवाशाने टरबूज खरेदी केले आणि ते थंड होण्यासाठी पाण्यात टाकले. पाण्यात टाकताचा त्याच्यातून फेस येऊ लागला.

फेस येण्याचे प्रमाण वाढल्याने त्यांनी ते अंगणात नेऊन ठेवले. त्यानंतर आणखीनच फेस आला आणि नंतर काही वेळातच त्या टरबुजाचा जोरात स्फोट झाला. स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की त्याने घरातले भांडेही पडले. असं का झालं असावं हे सांगताना यवतमाळच्या कृषी विज्ञान केंद्राचे किटकशास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मगर टरबूज स्फोटाच्या घटना अनेकदा घडत असल्याचे म्हणाले.

ते म्हणाले की शेतकरी फळाच्या वाढीसाठी ग्रोथ प्रमोटरचा वापर करतात. यातून फळाचा आकार वाढतो. क्षमतेपेक्षा अधिक आकार वाढल्याने असा स्फोट होतो. व्यापारीही फळांना पिकविण्यासाठी कार्बाईडसारखी रसायने वापरतात. याचे प्रमाण अधिक झाल्यास स्फोट होतो. शेतात टरबुजाने अधिक पाणी शोषण केले असेल तरीही असा स्फोट होऊ शकतो, असं ते म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.