तरुणाने चक्क 8 वेळा केले भाजपला मतदान, व्हिडिओ व्हायरल
नवी दिल्ली : खरा पंचनामा
एका तरुणाने आठवेळा भाजपाला मतदान केले. त्याने हे कृत्य करताना स्वताच व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केले. या प्रकाराने देशभरात संताप व्यक्त होत आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार पोलिसांनी या प्रकरणी राजन सिंग या तरुणाला अटक केली आहे. दरम्यान, या प्रकाराचा व्हिडिओ अखिलेश यादव यांनी 'एक्स'वर पोस्ट केल्यानंतर तो रिपोस्ट करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपा आणि निवडणूक अधिकारी यांना इशारा दिला आहे.
व्हिडीओत भाजपाचे उमेदवार मुकेश राजपुत यांना एक तरुण चक्क आठ वेळा मतदान करताना दिसत आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारामुळे नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
राहुल गांधी यांनी म्हटले की, पराभव दिसू लागल्याने भाजपाला सरकारी यंत्रणेवर दबाव आणून लोकशाही धोक्यात आणायची आहे. निवडणुकीचे कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडून घटनात्मक जबाबदारी विसरू नये. अन्यथा, इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यास त्यांच्यावर अशी कारवाई करण्यात येईल की भविष्यात कोणीही संविधानाच्या शपथेचा अवमान करण्यापूर्वी १० वेळा विचार करेल.
तर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव एक्सवरील पोस्टमध्ये हा व्हिडिओ पोस्ट करून म्हटले होते की, निवडणूक आयोगाला असे वाटत असेल की हे चुकीचं आहे, तर त्यांनी कारवाई करावी. ही भाजपाची बूथ कमेटी नसून लूट कमेटी आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.