Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीतील शिरढोणजवळ 8.52 लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त, तिघाना अटक सांगली राज्य उत्पादन शुल्कची कारवाई : अधीक्षक प्रदीप पोटे यांची माहिती

सांगलीतील शिरढोणजवळ 8.52 लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त, तिघाना अटक
सांगली राज्य उत्पादन शुल्कची कारवाई : अधीक्षक प्रदीप पोटे यांची माहिती



सांगली : खरा पंचनामा

राज्य उत्पादन शुल्कच्या मिरज येथील कार्यालयाने कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण येथील टोल नाक्यावर 8.52 लाख रूपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. दारूची वाहतूक करणारी कार जप्त करण्यात आली असून तिघाना अटक करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी दिली.  

हर्षद जगन्नाथ जाधव, गणेश अशोक जाधव, संदेश शिवाजी पवार (सर्व रा. पाचेगाव बुध्रुक, ता. सांगोला, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यांच्या सीमेवर तपासणी नाके आहेत. शिवाय त्यांची भरारी पथकेही जिल्ह्यात गस्त घालत आहेत. रविवारी रात्री रत्नागिरी-नागपुर एक्सप्रेस वेवरुन एका कारमधून (एमएच 03 एझेड 5836) गोवा बनावटीच्या दारूची तस्करी होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या मिरज कार्यालयातील निरीक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मिळाली. त्यांनी मिरज-सोलापूर रस्त्यावर गस्त सुरू केली. 

रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास 
शिरढोण येथील टोल नाक्याजवळ मिळालेल्या माहितीनुसार टोयोटा कार आल्यानंतर पथकाने ही कार थांबवायचा इशारा केला. त्यावेळी कार वेगाने निघुन गेली. पथकाने पाठलाग करून ती पकडली. या कारची तपासणी केली. त्यामध्ये गोवा बनावटीची विविध कंपन्यांच्या विदेशी दारूच्या बाटल्यांचे बॉक्स आढळून आले. या दारूबाबत चौकशी केल्यानंतर हर्षद आणि गणेशने ही दारू विक्रिस आणली असल्याचे सांगितले. तसेच त्यांचा साथीदार संदेश पवार याच्याकडे ही दारू नेत असल्याचे सांगितले. कारसह दारू जप्त करून दोघांना अटक करण्यात आली. तर पवार याच्या घरातून बनावट दारू, रिकाम्या बाटल्या, बुचे जप्त करून त्याला अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ) (ई) ९० व १०८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

राज्य उत्पादन शुल्कचे कोल्हापूरचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, सांगलीचे अधीक्षक प्रदीप पोटे, उपाधीक्षक ऋषिकेश इंगले यांच्या मार्गदर्शनाने मिरजेचे निरीक्षक दीपक सुपे, सहायक दुय्यम निरीक्षक सहायक दुय्यम निरीक्षक शरद केंगारे, इरफान शेख, स्वप्नील आटपाडकर, संतोष बिराजदार, कविता सुपने आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.