Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

घरकामाला बाई हवी म्हणून पतीचे लावले दुसरे लग्न बँक मॅनेजर असलेल्या पत्नीचा पराक्रम !

घरकामाला बाई हवी म्हणून पतीचे लावले दुसरे लग्न
बँक मॅनेजर असलेल्या पत्नीचा पराक्रम !भागलपूर : खरा पंचनामा

आजकालच्या काळात काय होईल याचा काहीच अंदाज लावता येत नाही. घरात कामवाली हवी म्हणून महिला हवे तितके पैसे मोजायला तयार असतात. केवळ पैसेच नाहीतर कामवाल्या मावश्यांच्या सर्व अटीही त्या पूर्ण करतात. पण, घरात कामाला बाई हवी म्हणून एका महिलेने चक्क नवऱ्याचं दुसरं लग्न लावलं आहे.

होय हे खरं आहे, बिहारच्या जगदीशपूर पोलीस स्टेशन हद्दीतील सेनो गावातील रहिवासी संजय रविदास यांची मुलगी काजल हिचा विवाह 2 मे रोजी खरगपूर, मुंगेर येथील रहिवासी हिरालाल दास याच्याशी हिंदू रितीरिवाजांनुसार झाला होता. 4 मे रोजी काजल आणि हिरालाल दिल्लीत आले.

दिल्लीतील घरात एक-दोन दिवस सर्व काही व्यवस्थित चालले. त्यानंतर हिरालाल दास यांनी त्यांची पहिली पत्नी संगीता देवी यांच्यासोबत एकाच घरात राहण्यास आणि पत्नीसारखेच वेळ घालवण्यास सुरूवात केली.

दुसरी पत्नी काजलने त्याला विचारले असता हिरालालने सांगितले की, घरात असणारी दुसरी महिला त्याची पहिली पत्नी आहे. आणि आता ती तुझी सवत आहे. घरात कामाचा ढिग पडलेला असायचा. त्यामुळे मी तुझ्याशी लग्न केलं आहे, असे हिरालालने काजलला सांगितले.

यावर तो असेही म्हणाला की, हे सत्य ऐकल्यानंतर तूला इथे राहायचे असेल तर राहा, नाहीतर निघून जा. यानंतर काजलने भांडण केले तेव्हा या नवरा बायकोनी तिला मारहाण केली. तिला कोंडून ठेवण्याचा प्रकारही झाला. पण ती तिथून पळून पुन्हा गावी आली.

काजलने दिल्लीहून भागलपूर गाठले आणि येथील पोलिस ठाण्यात या प्रकाराबद्दल पती आणि त्याची पहिली पत्नी यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल करून आरोपी पतीवर कारवाई करण्याची मागणी केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.