Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सासऱ्याने केले जावयाचे अपहरण, लग्नात केलेल्या खर्चाची मागणी

सासऱ्याने केले जावयाचे अपहरण, लग्नात केलेल्या खर्चाची मागणी



वसई : खरा पंचनामा

वसईत राहणाऱ्या सासऱ्याने मुंबईतील मानखुर्द येथील २४ वर्षीय जावयाचे अपहरण करून वसई येथे एका खोलीत डांबून ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अपहरण करण्यात आलेल्या जावयाला मारहाण करून सुटकेसाठी लग्नात झालेल्या खर्चाची मागणी करण्यात आली होती.

शिवाजी नगर पोलिसांनी सासऱ्याच्या तावडीतून जावयाची सुटका करून सासऱ्यासह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अक्रम हैदर अली कुरेशी (२४) असे सासऱ्याच्या तावडीतून सुटका करण्यात आलेल्या जावयाचे नाव आहे. गोवंडीतील शिवाजी नगर येथे कुटुंबियांसह राहणारा अक्रम हा रिक्षाचालक आहे. ५ जुलै २०२३ मध्ये अक्रम याचा विवाह वसई येथे राहणाऱ्या सकिना खातून (२०) हिच्यासोबत झाला होता. महिन्याभरापूर्वी अक्रम याचे सासरे फिरोज अन्सारी (४५) हे अचानक गोवंडी येथे आले जावई अक्रम याला काहीही न सांगता मुलीला माहेरी वसई येथे घेऊन गेले. व त्यांनी महिना उलटूनही मुलीला सासरी पाठवले नाही. 

२५ मे रोजी सायंकाळी मित्र जाफर शेख याचा अक्रमचा फोन आला व त्याने चहा पिण्यासाठी अक्रमला मानखुर्द साठे नगर येथे बोलावून घेतले, दरम्यान त्या ठिकाणी सासरे फिरोज अन्सारी आणि त्यांच्या सोबत इतर तिघे-चौघे आले व त्यांनी बळजबरीने अक्रमला एका मोटारीत बसवले त्याचे तोंड आणि डोळे कापडाने बांधून तेथून त्याला थेट वसई येथे घेऊन आले व एका खोलीत डांबून ठेवले. त्या ठिकाणी त्याला मारहाण केली, त्यानंतर सासऱ्याने अक्रमच्या आई आणि भावाला फोन करून लग्नात झालेला खर्च व लग्नात दिलेले सर्व साहित्य आणून द्या, नाहीतर अक्रमला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी सासरा फिरोज याने दिली.

अक्रमच्या कुटुंबीयांनी तात्काळ शिवाजी नगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली, पोलिसांनी तात्काळ एक पथक वसई येथे रवाना केले व तेथून अक्रम याची सुटका करून सासरे फिरोज अन्सारी यांच्यासह पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांना शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याविरुद्ध अपहरण, डांबून ठेवणे, मारहाण करून धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.