चिरीमिरीनंतर आता 'दक्षिणा' आणि 'खुशी'चा नवा फंडा!
'खा की' खा आणखी किती खालच्या पातळीवर उतरणार?
सांगली : खरा पंचनामा
शासनाचा 'खा की' विभाग सर्वाना चांगलाच परिचित आहे. तो त्यांच्या चिरीमिरीमुळे. मात्र आता तुमचीच वस्तू तुम्हाला परत देताना या 'खा की' ने 'दक्षिणा' आणि 'खुशी'चा नवा फंडा सुरू केला आहे. त्यामुळे 'खा की' आणखी किती खालच्या पातळीवर उतरणार? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.
राज्याचा 'खा की' विभाग सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. 'खा की'चे रक्षणकर्ते तर चिरीमिरी घेत असल्याचे तर उघड गुपित आहे. आता या विभागातील काही महाभागांनी 'दक्षिणा' आणि 'खुशी'च्या नावाखाली वसुलीचा नवा फंडाच सुरू केला आहे. तुमचीच वस्तू तुम्हाला परत करण्यासाठी आता 'चिरिमिरी' नाही तर 'दक्षिणा' किंवा 'खुशी' द्यावीच लागते असा अलिखित नियमच बनला आहे.
तुमचीच वस्तू तुम्हाला परत करण्यासाठी किती कष्ट केले, रात्रीचा दिवस केला, वाहनांची सोय केली त्याचे भाडे द्यावे लागले, शिवाय साहेबांनाही द्यावे लागतात अशी अनेक ना अनेक कारणे सांगत 'खा की'चे काही महाभाग दक्षिणा आणि खुशीच्या नावाखाली गरीबांना नडत असल्याचे चित्र आहे. शिवाय यासह अनेक प्रकरणे यांच्याकडे येत असल्याने शिवाय या 'खा की'चा दरारा असल्याने नागरिक वरीष्ठांकडे तक्रार करण्यास धजावत नाहीत त्याचाच फायदा हे लोक घेत आहेत.
त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक प्रकरणात काही ना काही कारणाने चिरीमिरी घेणारे आता 'दक्षिणा' आणि 'खुशी'वर येवून ठेपले आहेत. अशा महाभागांना वरीष्ठांनीच योग्य ती शिक्षा केली तरच या प्रकारांना काही प्रमाणात आळा बसू शकेल असे नागरिकांचे म्हणणे आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.