Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कार कॅनॉलमध्ये कोसळून एकाच कुटुंबातील सहा ठार, एक गंभीर जखमी मणेराजुरी जवळ अपघात

कार कॅनॉलमध्ये कोसळून एकाच कुटुंबातील सहा ठार, एक गंभीर जखमी
मणेराजुरी जवळ अपघातसांगली : खरा पंचनामा

तासगाव - मणेराजुरी मार्गावर कार ताकारी कालव्यात कोसळून झालेल्या अपघातामध्ये सहाजणांचा मृत्यू झाला तर एकजन गंभीर जखमी झाला आहे. झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, चिंचणी तासगाव - मणेराजुरी मार्गावर चिंचणी हद्दीत मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला.

राजेंद्र जगन्नाथ पाटील (वय 60), सुजाता राजेंद्र पाटील (वय 55), प्रियांका अवधूत खराडे (वय 30, रा. बुधगाव), ध्रुवा (वय 3) कार्तिकी (वय 1), राजवी (वय 2) अशी ठा र झालेल्याची नावे आहेत. तर स्वप्नाली विकास भोसले (वय 30) या जखमी झाल्या आहेत.

मंगळवारी मध्यरात्री ऑल्टो कार थेट ताकारी कॅनॉलमध्ये जाऊन कोसळली. पाणी नसल्यामुळे हा कॅनॉल कोरडा होता. त्यामुळे वेगात असलेली ऑल्टो कार कॅनॉलमध्ये जोरात आदळली. यामध्ये कारमधील सहा जण जागीच ठार झाले. तर एक महिला गंभीररित्या जखमी झाली आहे.

या दुर्घटनेतील सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचे समजते. हे कुटुंब तासगावमधीलच होते. अपघाताच्यावेळी कारमध्ये एकूण सात जण होते. मुलीच्या वाढदिवसानिमित्त पाटील-भोसले कुटुंबीय तासगाववरून वाढदिवसासाठी कवठेमहांकाळ येथील कोकळे गावात गेले होते. तेथून परतत असताना हा अपघात झाला. 

चालकाच्या डोळ्यांवर झोप असल्याने त्याला डुलकी लागली असावी आणि कार थेट कॅनॉलमध्ये कोसळली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. 

अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यांसह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

हा अपघात झाला तेव्हा रात्रीचा दीड वाजला होता. त्यावेळी आजुबाजूला कोणीही नव्हते. परिणामी या कुटुंबाला वेळेत मदत मिळाली नाही. बुधवारी पहाटे एका व्यक्तीला हा प्रकार समजल्यानंतर त्याने आरडाओरड करत याची माहिती गावकऱ्यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी माहिती देत गावकऱ्यांनी बचावकार्य सुरु केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.