Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

हिट अँड रन प्रकरणातील मयताच्या कुटुंबियांना मिळणार दोन लाखांची मदत

हिट अँड रन प्रकरणातील मयताच्या कुटुंबियांना मिळणार दोन लाखांची मदत



मुंबई : खरा पंचनामा

अपघात झाल्यानंतर काहीजण घटनास्थळी न थांबता, तसेच घटनेची माहिती न देता पळून जातात. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जातो. मात्र आरोपी मिळून येत नाही. अशा प्रकरणांमध्ये मयताच्या कुटुंबियांना दोन लाखांची मदत करण्याची योजना आहे.

रस्ते अपघातात एखाद्या वाहनाच्या धडकेत जखमी अथवा मृत्यूमुखी पडल्यास अशा नागरिकांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आहे. त्यानुसार रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने या संदर्भात 25 फेब्रुवारी 2024 रोजी अधिसूचना देखील प्रसिद्ध केली आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी अथवा मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्यासाठी केंद्रीय मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 59 (1) अंतर्गत प्रत्येक जिल्हा स्तरावर त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. या समितीमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, उपजिल्हाधिकारी आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांचा समावेश असतो.

रस्ते अपघातात जखमी अथवा मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना याबाबत त्रिसदस्यीय समितीकडे अर्ज करावा लागतो. त्यानंतर समितीच्या बैठकीत या अर्जाबाबत चर्चा केली जाते. या त्रिसदस्यीय समितीकडून अपघाताच्या गुन्ह्याची कागदपत्रे, घटनास्थळावरील पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, वैद्यकीय अहवाल आणि इतर कागदपत्रांची पडताळणी केली जाते.

कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर ही समिती जिल्हाधिकाऱ्यांकडे (आहरण व संवितरण अधिकारी) मदतीची शिफारस केली जाते. पात्र अर्जदारांना दोन लाखांची नुकसान भरपाई मिळते. अपघात झाल्यानंतर गुन्हा दाखल केला जातो. त्याचा तपास करूनही पोलिसांना आरोपीचा शोध लागला नाही तर संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांना यासाठी अर्ज करता येतो.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.