लाठीचार्ज निषेधार्ध धाराशिवमध्ये मराठा समाज आक्रमक
आंदोलकांनी रस्त्यावर उतरत जाळले टायर
धाराशिव : खरा पंचनामा
धाराशिव जिल्ह्यात सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती उत्सवादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्ध समाज आक्रमक झाला. या लाठीचार्जच्या विरोधात एकत्र येत मराठा समाजाच्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेनंतर जिल्ह्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिवमध्ये सकल मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. धाराशिवमध्ये संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर मराठा समाजाच्या आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ रस्त्यावर टायर जाळले.
पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या कारणावरून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. मराठा समाजाच्या आंदोलकांनी पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलकांनी पोलीस अधिक्षक कार्यालयासमोरील रस्त्यांवर टायर जाळले. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
दरम्यान, पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या विरोधात मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेत मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचले. यावेळी घोषणाबाजी केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.