Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसेंचे राजकीय नेत्यांची घनिष्ठ संबंध खेडच्या प्रांताधिकाऱ्यांचे निवडणूक आयोगाला पत्र

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसेंचे राजकीय नेत्यांची घनिष्ठ संबंध 
खेडच्या प्रांताधिकाऱ्यांचे निवडणूक आयोगाला पत्रपुणे : खरा पंचनामा

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे खेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदारांसोबत घनिष्ठ राजकीय संबंध असून ते त्यांच्या प्रभावाखाली काम करत आहेत, असा आरोप खेडचे प्रांताधिकारी तथा खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी करत मतमोजणीपूर्वी डॉ. दिवसे यांची बदली करावी. अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत स्थानिक अधिकारी, कर्मचारी पारदर्शकपणे काम करू शकणार नाहीत, अशा आशयाचे पत्र कट्यारे यांनी महाराष्ट्राचे प्रधान सचिव, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि केंद्रीय निवडणूक आयुक्त यांना बुधवारी पाठविले. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना या पत्रामुळे जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

डॉ. दिवसे यांची लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाली. त्यांनी पुण्यामध्ये कृषी आयुक्त, क्रीडा आयुक्त, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त, तसेच विविध पदांवर पुणे जिल्ह्यातच गेल्या अनेक वर्षांपासून काम केले आहे. त्यामुळे त्यांचे पुण्यातील राजकीय व्यक्तींशी घनिष्ठ संबंध असून त्यांचे वर्तन राजकीय नेत्यांना अनुकूल आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना त्यांच्या अधिकारात नसताना डॉ. दिवसे यांनी माझे भूसंपादनाचे अधिकार काढून घेतले आहेत. तसेच माझी यापूर्वी सुरू असलेल्या भूसंपादनाच्या कामाची चौकशी सुरू असताना स्वतंत्र चौकशी पथक नेमून २८ मे रोजी कोणतीही कल्पना न देता माझ्या आणि खेड तहसीलदार यांच्या कार्यालयावर छापा टाकून झडती घेतली. 

हे सर्व खेडच्या विद्यमान आमदारांना हाताशी धरून माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. खेडचे स्थानिक विद्यमान आमदारांना मी आणि माझे तहसीलदार यांचे काम सुरू ठेवू द्यायचे नाही, म्हणून राजकीय आणि आर्थिक कारणास्तव आमची बदली करायची आहे. त्यामुळे डॉ. दिवसे यांनी अधिकृतपणे काम करण्याऐवजी काही राजकीय व्यक्तींचे मध्यस्थ म्हणून काम करत आहेत, असे गंभीर आरोप कट्यारे यांनी पत्रात केले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.