Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्य उत्पादन शुल्कचे पुण्याचे अधीक्षक चरणसिंह राजपूत अडचणीत

राज्य उत्पादन शुल्कचे पुण्याचे अधीक्षक चरणसिंह राजपूत अडचणीत



पुणे : खरा पंचनामा

कल्याणीनगरमध्ये १९ मे रोजी पहाटे अडीचच्या सुमारास घडलेल्या प्राणांतिक अपघातानंतर रोज नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे बुधवारी (दि. २९) तक्रार करण्यात आली असून त्यांच्या मालमत्तेच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

या अपघातानंतर पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारभारावर आणि अधिकाऱ्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. हफ्ते घेऊन बेकायदेशीर बार आणि पब सुरु असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांनी केला. सुषमा अंधारे यांनी तर कोणत्या बार आणि पबकडून किती पैसे घेतले जातात, त्याची यादीच वाचून दाखवली. शहरातील 'नाइटलाSing घालणारे उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक चरणसिंह राजपूत यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले. दरम्यान, राजपूत यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अजय भोसले यांनी तक्रार दाखल केली आहे.

अजय भोसले यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागास केलेल्या तक्रारीमध्ये पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागातील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावांचा समावेश आहे. त्यामध्ये अधीक्षक चरणसिंग रजपूत, सागर सुर्वे, कॉन्स्टेबल समीर पडवळ (राजपूत यांचा चालक/खासगी कामे पाहणारा कर्मचारी), पिंपरी विभागात नेमणुकीस असणारा आणि राजपूत यांच्या सतत संपर्कात असणारे कॉन्स्टेबल स्वप्नील दरेकर यांच्या नावाचा समावेश असून या सर्वांच्या मालमत्तेची व व्यवहाराची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी भोसली यांनी केली आहे.

भोसले यांनी केलेल्या तक्रारीमध्ये राजपूत हे पुणे शहर व ग्रामीण भागातील पब, बार, वाईन शॉप, बिअर शॉपी, हॉटेल चालक/मालक, यांच्याकडून प्रतिमहिना ६० ते ७० लाख रुपये लाच गोळा करत असल्याचे म्हटले आहे. सोबतच कोणाकडून किती रुपये पैसे घेतले जातात, याचा तपशीलदेखील त्यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे दिला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.