Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरण; बदलेले रक्त एका महिलेचे, चौकशी समितीचा अहवाल

पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरण; बदलेले रक्त एका महिलेचे, चौकशी समितीचा अहवाल



पुणे : खरा पंचनामा

पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी सर्वात मोठी अपडेट आता समोर आली आहे. पोर्शे अपघातातील अल्पवयीन आरोपीचे बदललेले रक्त एका महिलेचे असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर आता ती महिला कोण? असा प्रश्न निर्माण होत आहे. अल्पवयीन तरुणाच्या रक्ताच्या नमुण्याऐवजी एका महिलेचे रक्त घेण्यात आले होते. ससून रुग्णालयात बदलण्यात आलेले रक्त एका महिलेचे असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. ही माहिती चौकशी समितीच्या अहवालात समोर आली आहे.

महिलेचे रक्त सील करून त्यावर अल्पवयीन तरुणाचे नाव लिहून पुढे पाठवण्यात आलं होतं, असं उघडकीस आलं आहे. पुण्यातील हिट अँड रन प्रकरणातील आरोपींच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार झाले होते. त्याबाबत आतापर्यंतची ही सर्वात मोठी अपडेट आहे. तर हे रक्त बदल करण्यासाठी बाहेरील चार व्यक्तींचा समावेश असल्याची देखील माहिती मिळत आहे. आता हे चार व्यक्ती कोण? याचा शोध पोलीस घेत आहेत. त्यासोबतच हे ब्लड रिपोर्ट आरोपीच्या आईचे तर नाही, असा संशय देखील पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी डॉ अजय डॉ श्रीहरी हाळनोरवर दबाव होता, अशी कबुली पोलिसांसमोर डॉ श्रीहरी हाळनोरने दिली आहे. डॉ. तावरे आणि विशाल यांचं बोलणं झालं. त्यानंतर रक्त बदल करण्यासाठी माझ्यावर तावरेंनी दबाव टाकला, असं स्वतः डॉ. हाळनोरने सांगितलं आहे. डॉ. हाळनोरच्या कबुलीमुळे आता डॉ. तावरेच्या अडचणी आणखी वाढणार असल्याचं चित्र दिसत आहे.

रक्त बदल केलं होतं. पण ते माझ्या मनाला पटत नव्हतं. माझ्याकडून मोठी चूक झाल्याचं मला वाटत होते, अशी कबुली डॉ. हाळनोरने दिली आहे. डॉ. श्रीहरी हाळनोर सध्या गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत आहे. पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपीच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाचे डॉ. तावरे, श्रीहरी हाळनोर आणि शिपायी अतुल घटकांबळे यांना अटक केली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.