Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अल्पवयीन मुलांना मद्य पुरवणे भोवले! सागर चोरडिया आणि प्रल्हाद भुतडा यांच्यावर आरोपपत्र; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

अल्पवयीन मुलांना मद्य पुरवणे भोवले!
सागर चोरडिया आणि प्रल्हाद भुतडा यांच्यावर आरोपपत्र; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाईपुणे : खरा पंचनामा

कल्याणी नगरमध्ये रविवारी पहाटे झालेल्या अपघातात दोन जणांना प्राण गमवावे लागले. हा अपघात घडण्यापूर्वी आरोपी अल्पवयीन मुलाने मेरियट सुट्समधील ब्लॅक आणि कोझी रेस्टॉरंटमध्ये अशा दोन ठिकाणी पार्टी केली होती. यातील ब्लॅक पब बार विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे.

मेरीयट सुट्स या पंचतारांकित हॉटेलच्या ब्लॅक नावाच्या पबमध्ये अल्पवयीन मुलांना मद्य विकणे महागात पडले असून याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने पंचशील इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक सागर चोरडिया यांच्या विरोधात न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल केले आहे. यासोबतच कोझी या बारचे मालक प्रल्हाद भुतडा यांच्याविरुद्ध देखील आरोप पत्र दाखल करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने 17 मे 2024 ते 19 मे 2024 या कालावधी दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेज मध्ये अल्पवयीन मुलांना मद्य पुरवले जात असल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. या तपासणीमध्ये या बारमधील कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आवश्यक असलेले रजिस्टर देखील ठेवण्यात आलेले नव्हते. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमानुसार या ठिकाणी रजिस्टर ठेवणे आवश्यक आहे. यासोबतच नोकरनामादेखील पुरवण्यात आलेला नव्हता. त्यामुळे चोरडिया यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

यासोबतच ट्रिलियन या घोरपडी मधील आस्थापनेच्या प्रल्हाद भुतडा यांच्या विरोधात देखील एक आरोप पत्र दाखल करण्यात आलेले आहे. या ठिकाणी असलेले १७ मे रोजीचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या ठिकाणी अल्पवयीन मुलांना दारू पुरवली जात असल्याचे समोर आले. यासोबतच या ठिकाणी देखील रजिस्टर ठेवण्यात आलेले नव्हते. तसेच, नोकरनामा ते पुरविण्यात आलेला नव्हता आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निकष पाळण्यात आलेले नव्हते. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात कागदपत्रांची मागणी केली असता ते देखील पुरवण्यात आले नाहीत. त्यांना याबाबत नोटीस देण्यात आली होती. अपघाताशी या कारवाईचा संबंध नाही.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.