राज्यात कोरोनाचा नवा व्हेरियंट दाखल; एकाच दिवसात तब्बल ९१ रुग्णांची नोंद
सांगलीतही एक रुग्ण
मुंबई : खरा पंचनामा
कोरोनाचा जेएन १ नंतरचा नवा व्हेरियंट केपी २ (फ्लर्ट) हा राज्यात दाखल झाला आहे. या नव्या व्हेरियंटचे ९१ रुग्ण राज्यात आढळले असून नागरिकांनी काळजी करू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत नव्या व्हेरियंटच्या ९१ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. जे लोक आधीच मधुमेह, हायपरटेन्शन, हृदयविकार यांसारख्या इतर आजारांनी त्रस्त असल्याने काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
या रुग्णांपैकी पुण्यात ५१, ठाण्यात २०, अमरावतीमध्ये ७, छत्रपती संभाजीनगरमध्ये ७, सोलापूरमध्ये २, अहमदनगर, लातूर, सांगली आणि नाशिकमध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे.
शनिवारी राज्यात ४ नवीन कोविड रुग्ण आढळून आले, त्यात मुंबईत ३ आणि नागपूरमध्ये एक रुग्ण आढळला आहे. नव्या व्हेरियंटचे जिनोम सिक्वेन्सिग हे महिनाभरापूर्वीचे असून या व्हेरियंटचा कोणताही धोका नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे साथरोग सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.