Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दारूच्या नशेत मित्राचा खून करणाऱ्यास अवघ्या काही तासांत अटक कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिसांची कारवाई

दारूच्या नशेत मित्राचा खून करणाऱ्यास अवघ्या काही तासांत अटक
कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिसांची कारवाई



कोल्हापूर : खरा पंचनामा

दारूच्या नशेत शिवीगाळ करत मारहाण करणाऱ्या मित्राचा गळा आवळून खून करणाऱ्यास अवघ्या काही तासात अटक करण्यात आली. रविवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास कोल्हापुरातील राजारामपूरी येथील कोटणीस हाईटस अपार्टमेंटमध्ये खुनाची ही घटना घडली होती अशी माहिती राजारामपुरीचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिली. 

सन्मेश अशोक तेंडूलकर (वय ५४, रा. कोटणीस हाईटस, राजारामपुरी, सातवी गल्ली, कोल्हापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर दिनेश अशोक सोळांकूरकर (वय ३४, रा. गारगोटी) असे मृत तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी सुजाता अशोक सोळांकुरकर (वय ५५, रा. गारगोटी) यांनी फिर्याद दिली आहे. 

संशयित सन्मेश तेंडूलकर आणि त्याचा मृत मित्र दिनेश सोळांकुरकर हे दोघेजण सन्मेशच्या राजारामपुरी येथील कोटणीस हाईटस या अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये दारू पित बसले होते. रविवारी पहाटे दारूच्या नशेत मृत दिनेश सन्मेश याला शिवीगाळ करून मारहाण करत होता. त्यामुळे चिडलेल्या सन्मेश याने त्याचा गळा आवळून खून केला होता. घटनेची माहिती मिळताच निरीक्षक तनपुरे फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सन्मेश याच्याकडे कौशल्यपूर्ण रीतीने सखोल चौकशी केल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. 

कोल्हापूर शहरचे पोलिस उपअधीक्षक अजित टिके, राजारामपुरीचे निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक विकास अडसूळ, समीर शेख, अरविंद पाटील, रंगराव चव्हाण, रणजित साळवी, विशाल शिरगावकर, सुरेश काळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.