Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दोन्ही राष्ट्रवादी भविष्यात एकत्र येणार? अजित पवारांचे सूचक विधान

दोन्ही राष्ट्रवादी भविष्यात एकत्र येणार? 
अजित पवारांचे सूचक विधान



पुणे : खरा पंचनामा

मोदींसोबत जाण्यासाठी ज्यांनी पक्ष सोडला, त्यांना पुन्हा प्रवेश नाही, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली. त्यांच्या या भूमिकेबद्दल बोलताना अजित पवारांनी एक विधान केले.

ज्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी भविष्यात एकत्र येऊ शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. अजित पवारांनी उदाहरण देत पवारांच्या विधानावर उत्तर दिलं. त्याचबरोबर शरद पवार त्यांच्या मनाप्रमाणेच निर्णय घेतात आणि सर्वांनी मिळून घेतल्याचे दाखवतात, असेही अजित पवार म्हणाले.

अजित पवार यांची पुण्यात पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवारांनी विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली. शरद पवारांनी प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे विधान केले त्यावरही ते बोलले. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील वाटचालीचा निर्णय सहकाऱ्यांशी चर्चा करून घेऊ, असं शरद पवार एका मुलाखतीत म्हणालेले. त्यावरही अजित पवारांनी भाष्य केले.

"पवार साहेबांना ज्यावेळी निर्णय घ्यायचा असतो, तेच बाकीच्या सहकाऱ्यांना सांगतात आणि असं दाखवतात की, तो सामूहिक निर्णय आहे. आम्ही जो निर्णय घेतला, तेव्हा ते एकटे त्या गोष्टीला विरोध करत होते. किंवा मध्येच म्हणायचे की, तुम्ही जा. मी आता बाजूला होतो. मी निवृत्त होतो, असं ते करायचे. ते त्यांना पाहिजे तेच करतात. फक्त दाखवताना हा सामूहिक निर्णय आहे, असं दाखवतात. परंतू त्यांच्या मनामध्ये जे असतं, तेच ते ठामपणे करतात", असे उत्तर अजित पवार यांनी दिले.

'शरद पवार म्हणाले की, ज्यांनी मोदींसोबत जाण्यासाठी पक्ष सोडला आहे. त्यांना पक्षात पुन्हा प्रवेश नाही', असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला.

त्यावर ते म्हणाले की, 'अरे तुम्ही ना काहीतरी अर्थ त्यातून काढता. अहो, निलेश लंकेंनी पक्ष सोडला होता. निलेश लंकेंचं स्वागत करण्यात आलं ना... तुम्ही काय घेऊन बसलात. हे फक्त सांगायचं असतं. यात काही तथ्य नाही. मी तुम्हाला नेहमी सांगतो, राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो, कुणी कुणाचं कायमचा विरोधक नसतो. उगा मोठी लोक काही बोलली की, ते तसं बोलले आणि तुमचं काय मत आहे. बोलणारे बोलणारचं... त्यांना संभ्रमावस्था निर्माण करायचीच आहे. लोकांच्या मनामध्ये एक संशयकल्लोळ निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो."

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.