Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'पॅकेज'ने रकाने भरले, टीव्हीचे स्क्रीन झळकले! दादा, काका, मामांनी मतदारांना गृहीत धरले?

'पॅकेज'ने रकाने भरले, टीव्हीचे स्क्रीन झळकले!
दादा, काका, मामांनी मतदारांना गृहीत धरले?



सांगली : खरा पंचनामा

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराची रविवारी सांगता झाली. लागलीच उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी आतील खेळ्या सुरू केल्या आहेत. या निवडणुकीत उमेदवारांनी साम, दाम, दंड, भेद या नीतीचा अवलंब केल्याचे उघड-उघड दिसून आले. 'पॅकेज'ने रकाने भरून आणले, टीव्हीचे स्क्रीनही झळकवले पण त्यांच्या या प्रचाराच्या रणधुमाळीत दादा, काका, मामांनी मतदारांना गृहीत धरल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.  

लाखोंच्या 'पॅकेज'ने रकाने भरून आणले आणि टीव्हीचे स्क्रीन झळकवणे म्हणजे निवडून येण्याचा खास फंडा असा गैरसमज बहुतांश निवडणुकीत दिसून येतो. मात्र मतदारांनाही आता उमेदवारांचा हा फंडा माहीत झाल्याने मतपेटीतून उमेदवारांचे 'महिमा मंडन' करणाऱ्यांना मतदार नेहमीच उत्तर देत असतात. तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर मतदारांमध्ये कोणी किती रकाने भरून आणले, टीव्हीवर कोण-कोण सातत्याने झळकले. कोणाचा आयटी सेल सोशल मिडियावर कोणता 'नरेटीव्ह' सेट करत होता याची चवीने चर्चा होत आहे. 

अशी पॅकेज मॅनेज करून अनेक दादा, काका, मामांना मतदारांना जणू गृहीत धरल्याचे दिसून आले. त्यामुळे मतदार मतपेटीतून कोणता कल देतात याकडे आता राजकीय धुरीणांचे लक्ष लागून राहिले आहे. रकाने भरण्यासाठी, टीव्हीवर झळकण्यासाठी लायकीप्रमाणे सेटिंग करण्यात आले होते अशी चर्चा आहे. उमेदवाराचा 'टीआरपी मॅनेज' करणाऱ्या या लोकांनी दादा तुम्हीच, काका तुमच्याशिवाय हाय कोण, मामा यंदा तुमचीच बाजी असे लांगूलचालन करून पदरात पॅकेजचे माप टाकून घेतले. 

या निवडणुकीत उमेदवारांनी स्वतःचे महिमा मंडन करताना मात्र सर्वसामान्य मतदारांना गृहीत धरल्याचे दिसून आले. या रकान्यांमधून, स्क्रीनवरून आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून उमेदवारांनी कितीही 'नरेटीव्ह' सेट करण्याचा प्रयत्न केला तरी मतदार मात्र सूज्ञ आहे हेही तितकेच खरे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.