Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कुणाचं वारं फिरलय तर कुणाचं वादळ आलयं, ढगही जमलेत पण मतदानाचा पाऊस पडणार का?

कुणाचं वारं फिरलय तर कुणाचं वादळ आलयं, ढगही जमलेत पण मतदानाचा पाऊस पडणार का?सांगली : खरा पंचनामा

सांगली जिल्ह्यात कुणा-कुणाचं वारं फिरलय तर कुणाचं वादळही आलयं मात्र मतदारांचा पाऊस कोणावर पडणार हे मात्र गुलदस्त्यात आहे. सांगली लोकसभेची निवडणूक अंतिम टप्प्यात रंगतदार बनली आहे. सर्वच उमेदवारांनी विजयावर दावाही केला आहे. मात्र वारं फिरून आणि वादळ येऊनही मतदानाचा पाऊस कोणाच्या अंगणात पडणार हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. 

कोल्हापूरकरांनी मागील काही निवडणुकांमधून आमचं ठरलयं अशी टॅग लाईन सुरू केली आहे. त्याच धर्तीवर सांगलीतही वारं फिरलयं, वादळ आलयं अशा टॅग लाईन या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पहायला मिळाल्या. देशपातळीपासून ते राज्यपातळीपर्यंतच्या स्टार प्रचारकांना आणून उमेदवारांनी जिल्ह्यात रान पेटवले. एकमेकांची उणी-दुणी काढली. मात्र प्रचाराचा हा धुरळा उडत असताना सांगलीकरांच्या प्रश्नांचा उहापोह अपवाद वगळता कोठेच दिसला नाही. 

या निवडणुकीत उमेदवारांनी एकमेकांना पाडण्याची तर भाषा केलीच शिवाय एकमेकांचे भ्रष्टाचारही जाहीरपणे मांडले. संबंधित उमेदवारांचे समर्थक, त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते वगळता यांच्या सभा, रॅलीमध्ये सामान्य सांगलीकर कोठे दिसलाच नाही. सोशल मिडियावरून केवळ सांगलीचे काही प्रश्न वगळता उमेदवारांनी सांगलीकरांच्या विकासाची 'मन की बात' काही केलीच नसल्याचे दिसून आले. 

एकंदरीत कितीही कुणाचं वारं फिरलं, कुणाचही वादळ आलं तरी मतदारांचा मतदानरूपी पाऊस कोणाच्या अंगणात पडणार हे दि. ४ जूनलाच स्पष्ट होणार आहे. वादळ, वाऱ्याला बाजूला करत सांगलीकर मतदार तिसराच कोणता पर्याय शोधतात का? हेही पाहण महत्वाचं ठरणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.