लोकसभेच्या निवडणुकीमुळे पोलिसांच्या बदल्यांना मुदत वाढ द्या
अप्पर पोलीस महासंचालकांचं गृह विभागाला पत्र
मुंबई : खरा पंचनामा
राज्यात लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. पाचव्या टप्प्याचं मतदान 20 मेला होणार आहे आणि त्यानंतर चार जूनला निकाल जाहीर होणार आहे. तोपर्यंत राज्यात आचारसंहित लागू असणार आहे.
लोकसभेच्या निवडणुकीमुळे पोलिसांच्या बदल्यांना मुदत वाढ मिळण्याची मागणी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिस दलातील पोलिस निरीक्षक ते पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्यांना मुदत वाढ देण्यात यावी, असे पत्र अप्पर पोलिस महासंचालकांनी गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना दिले आहे.
पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्या सर्व साधारण बदल्या एप्रिल मेमध्ये करणे आवश्यक आहे. मात्र सध्या लोकसभा निवडणूका पाहता, राज्यातील मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. तो पर्यंत आचार संहिता लागू राहणारत्या दरम्यान अधिकार्यांच्या सर्व साधारण बदल्यांची कार्यवाही करणे शक्य होणार नसल्याने मुदत वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे.
राज्यातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्या बदल्यांसाठी 30 जून पर्यंत मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी पत्राद्वारे अप्पर पोलिस महासंचालक (आस्थापना) चे संजीव सिंघल यांनी गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांकडे केली आहे. मागणीप्रमाणे मुदत वाढ मिळते की नाही, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.