Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मसूर येथील ए.टी.एममध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला उंब्रज आणि तळबीड पोलीसांनी बेड्या ठोकल्या

मसूर येथील ए.टी.एममध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला उंब्रज आणि तळबीड पोलीसांनी बेड्या ठोकल्या



संभाजी पुरीगोसावी 
सातारा : खरा पंचनामा 

उंब्रज पोलीस ठाणे आणि तळबीड पोलीस ठाण्याला मागील काही दिवसांपूर्वी नवे अधिकारी मिळाले असून. या अधिकाऱ्यांच्या धडक करावयामुळे अवैध धंदे वाल्यांचे तसेच सराईत आरोपींना देखील चांगलीच धडकी भरली आहे. या दोन्ही प्रभारी अधिकाऱ्यांनी पदभार घेतल्यापासून सर्वाधिक कारवाया केल्या आहेत. 

गुरुवारी तळबीड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स.पो.नि किरण भोसले हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत रात्रगस्त करीत असताना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शिवडे या गावाजवळील कृष्णा पुलाच्या अलीकडे रोडच्या बाजूस अंधारात पाच संशयित दिसून आले, त्यांच्या हालचालीवरून पोलिसांना संशय आल्याने त्यांनी उंब्रज पोलीस ठाण्याकडे स.पो.नि. रवींद्र भोरे व स्टाफ यांना तात्काळ बोलवून घेवुन तळबीड व उंब्रज पोलीस ठाण्याकडे अधिकारी व स्टाफ यांनी चार संशयितांना घेराव घालून ताब्यांत घेतले. त्यातील एक साथीदार अंधाराचा फायदा घेवुन पळून गेला. 

संशयित हे दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. त्यांच्या कब्जांमध्ये लहान, मोठे कटावणी, जिलेटीन कांड्या, डेटोनेटर लहान बॅटरी, एक्सा ब्लेड दोन मोठी करवत, कोयता, ब्लॅस्टींगची वाया, आणि दोन मोटरसायकल तोंडाचे मास्क असा एकूण एक लाख 37 हजार 900 रुपये किंमतीचे साहित्य मिळून आले, मसूर येथील हीताची कंपनीचे ए.टी.एम सेंटरवर जेलटीने स्फोट घडवून दरोडा टाकण्याचे प्लॅनिंग केले होते. मात्र पोलिसांनी ताब्यांत घेतल्याने मोठी घटना  टळली. वैभव राजेंद्र साळुंखे (वय ३३) ओंकार बाळासाहेब साळुंखे (वय २३) आदित्य संतोष जाधव (वय १९, सर्व रा. मोळाचा ओढा, सातारा) यांना ताब्यात घेण्यात आले तर विधीसंघर्षग्रस्त बालक पळून गेला आहे. 

सदरची कामगिरी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल-डुडी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अमोल ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तळबीड पोलीस ठाण्याचे स.पो.नि. किरण भोसले आणि त्यांचे सर्व सहकारी तसेच उंब्रज पोलीस ठाण्याचे स.पो.नि. रवींद्र भोरे यांच्यासह पोलिस ठाण्यातील सर्व सहकारी यांनी या कारवाईत सहभाग घेतला. सदर गुन्ह्यांचा पुढील तपास स.पो.नि. रवींद्र भोरे करीत आहेत. या उत्कृंष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी उंब्रज आणि तळबीड पोलीसांचे विशेष कौतुक केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.