Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नीतीश-नायडू सोडा, गेम चेंजर ठरणारे ते अन्य 17 खासदार?

नीतीश-नायडू सोडा, गेम चेंजर ठरणारे ते अन्य 17 खासदार?



नवी दिल्ली : खरा पंचनामा

लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल जाहीर झालाय. यावेळी एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाहीय. भाजपाच्या नेतृत्वाखालील NDA आघाडीला 292 जागा मिळाल्या आहेत. 272 या बहुमताच्या मॅजिक फिगरपेक्षा त्यांच्याकडे जास्त खासदार आहेत.

काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीकडे 234 खासदार आहेत. अशावेळी सगळ्यांच्या नजरा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि टीडीपीचे प्रमुख चंद्रबाबू नायडू यांच्याकडे लागल्या आहेत. जेडीयूकडे 12 आणि टीडीपीकडे 16 खासदार आहेत. दोघांचे मिळून 28 खासदार होतात. सध्याच्या परिस्थितीत हा आकडा खूप महत्त्वपूर्ण आहे.

नजर फक्त या दोन पक्षांवरच नाहीय, तर ते अपक्ष खासदार आणि पक्ष सुद्धा महत्त्वाचे आहेत, जे एनडीए आणि इंडिया आघाडी दोघांचा भाग नाहीयत. अशा खासदारांची संख्या 17 आहे. सरकारच भविष्य निश्चित करण्यात या खासदारांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे.

हे आहेत ते 17 खासदार : 
पप्पू यादव - अपक्ष, ओवैसी - AIMIM, चंद्रशेखर आजाद - आजाद समाज पार्टी (कांशीराम), सबरजीत सिंह खालसा - अपक्ष, अमृतपाल सिंह - अपक्ष, विशाल पाटील - अपक्ष, इंजीनियर राशिद - अपक्ष, पटेल उमेशभाई - अपक्ष, मोहम्मद हनीफा - अपक्ष, रिकी एन्ड्रयू - पीपुल्स पार्टी, रिचर्ड वानलालहमंगइहा - झोरम पीपुल्स मुवमेंट, हरसिमरत कौर बादल - शिरोमणि अकाली दल, पेद्दीरेड्डी वेंकट मिधुन रेड्डी - YSRCP, अविनाश रेड्डी - YSRCP, थानुज रानी - YSRCP,  गुरुमूर्ती मैडिला - YSRCP, जोयंता बसुमतारी - UPPL

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.