Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विशाल पाटील काँग्रेस सोबतच! काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना दिले पाठिंब्याचे पत्र

विशाल पाटील काँग्रेस सोबतच! 
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना दिले पाठिंब्याचे पत्र



सांगली : खरा पंचनामा

सांगली लोकसभा मतदार संघात यावेळी महविकास आघाडीच्या जगावाटपात राजकारण झाल्याने काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असणारे विशाल पाटील यांना अपक्ष लढावे लागले. या लढाईत त्यांनी विजय मिळवला आहे. निवडणुकीपूर्वी त्यांना राज्यसभेची ऑफर होती. शिवाय आताही त्यांना एनडीए सोबत जाण्याचा मार्ग असताना त्यांनी मतदारांना दिलेला शब्द पाळण्यासाठी काँग्रेसला अधिकृत पाठींबा दिला आहे.

गुरुवारी दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन त्यांनी इंडिया आघाडीत राहून काँग्रेस सोबतच राहण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत पाठींबा देणारे पत्र त्यांनी खर्गे यांच्याकडे सुपूर्त केले. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम उपस्थित होते

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.