Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटात अस्वस्थता, बैठकीला 5 आमदारांची दांडी

लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटात अस्वस्थता, बैठकीला 5 आमदारांची दांडी



मुंबई : खरा पंचनामा

महाराष्ट्रात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील अजित पवार गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने लोकसभेत राज्यभरात 10 जागांवर निवडणूक लढवली होती. यापैकी 8 जागांवर शरद पवार गटाच्या उमेदवारांचा विजय झालाय. तर अजित पवार गटाला केवळ रायगडच्या जागेवर विजय मिळाला आहे. तसेच राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं आहे. या निवडणुकीनंतर लगेच सहा महिन्यांनी राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे.

राज्यातील नागरिकांचा सध्याचा मूड हा महाविकास आघाडीच्या दिशेला आहे. त्यामुळे अजित पवार गटात अस्वस्थता असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांची आज बैठक बोलावली होती. या बैठकीला 5 आमदार गैरहजर होते, अशी माहिती समोर आली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्याकडून आता पक्षाला सावरण्याचा प्रयत्न केला जातोय. तसेच आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारी करण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून केला जातोय. त्यामुळे अजित पवार गटात सध्या जोरदार हालचाली सुरु आहेत. अजित पवार गटाच्या मंत्र्यांची आज अजित पवारांच्या 'देवगिरी' बंगल्यावर बैठक झाली होती. त्यानंतर सर्व आमदारांची ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला 5 आमदारांनी अनुपस्थिती होती. या पाचही आमदारांनी आपली कारणे पक्षाच्या वरिष्ठांना कळवल्याची माहिती समोर येत आहे. पण आमदारांच्या अनुपस्थितीवर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

अजित पवार गटाच्या आमदारांची आज बैठक पार पडली. या बैठकीला 5 आमदार उपस्थित नव्हते. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार नरहरी झिरवळ, सुनील टिंगरे, राजेंद्र शिंगणे, अण्णा बनसोडे, धर्मराव बाबा आत्राम या आमदारांची बैठकीत अनुपस्थिती राहिली. मंत्रिमंडळाचा विस्तार आता लवकरात लवकर करावा, अशी चर्चा या बैठकीत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये आलेल्या अपयशाबद्दलही या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.