उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी पोलिस दक्ष
विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची ग्वाही
कोल्हापूर : खरा पंचनामा
उद्योजकांच्या समस्या पोलिस प्रशासनाकडून सोडविल्या जातील. त्यासाठी दोन महिन्यातून एकदा उद्योजकांबरोबर त्या त्या भागातील पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एकत्रित बैठक आयोजित केली जाईल. उद्योजक हजारो लोकांना रोजगार देतात. त्यामुळे उद्योजकांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी पोलिस प्रशासन यापुढे दक्ष राहील, अशी ग्वाही कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली.
पोलिस प्रशासनाशी संबंधित असणार्या उद्योजकांच्या विविध समस्या जाणून घेण्याकरिता पोलिस आणि उद्योजकांच्या विशेष बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी महानिरीक्षक श्री. फुलारी बोलत होते. ते म्हणाले, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उद्योजकांचे मोठे सहकार्य पोलिस प्रशासनास मिळते असे ते म्हणाले. यावेळी स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन औद्योगिक संघटनेच्या अध्यक्षांनी सुनील फुलारी यांचा सत्कार केला.
यावेळी औद्योगिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. औद्योगिक वसाहतीमध्ये गस्त वाढवणे, सुरक्षेच्या दृष्टीने सीसी टीव्ही कँमेरे बसविणे, स्क्रॅप गोळा करणार्या महिला टोळीवर कारवाई करणे, अवैध धंदे बंद करणे, चोरी व लूटमार प्रकार घडू नयेत याकरिता योग्य त्या उपाय योजना करणे, पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील पोलीस चौकी करिता लागणारा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देणे, राष्ट्रीय महामार्गावर लक्ष्मी टेकडी येथे वाहतूक पोलीस नियुक्ती करणे, अतिक्रमण काढणे करिता पोलिस बंदोबस्त द्यावा आदी मागण्या केल्या.
यावेळी कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत, कोल्हापूर शहरचे उपअधीक्षक अजित टिके, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, एलसीबीचे निरीक्षक रवींद्र कळमकर आदी उपस्थित होते. बैठकीस शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर स्मॅकचे चेअरमन सुरेन्द्र जैन, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन गोशिमाचे अध्यक्ष नितीनचंद्र दळवाई, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल- हातकलंगले मॅकचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, संचालक संजय पेंडसे, स्मॅकचे संचालक सचिन पाटील, रणजीत जाधव, निमंत्रित सदस्य पांडुरंग बुधले आदीसह तिन्ही औद्योगिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.