Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

छत्रपती संभाजीनगरचे नवे पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी पदभार स्वीकारला सेवानिवृत्त पोलीस आयुक्त मनोजकुमार लोहिया यांना निरोप

छत्रपती संभाजीनगरचे नवे पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी पदभार स्वीकारला
सेवानिवृत्त पोलीस आयुक्त मनोजकुमार लोहिया यांना निरोप  संभाजी पुरीगोसावी 
छ. संभाजी नगर : खरा पंचनामा

आयपीएस अधिकारी तथा विद्यमान विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलवादी विरोधी अभियान) संदीप जी. पाटील यांनी शनिवारी छत्रपती संभाजीनगरचे नवे पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे. राज्य सरकारने शुक्रवारी त्यांची या पदावर नियुक्ती केली होती. छत्रपती संभाजीनगरचे मावळते पोलीस आयुक्त मनोजकुमार लोहिया 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले, त्यांना येथील  एमजीएमच्या एका दिमाखदार सोहळ्यात निरोप देण्यात आला. 

लोहिया यांच्या निवृत्तीपूर्वी राज्य सरकारने छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्त पदाचा पदभार विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलवादी विरोधी अभियान) संदीप पाटील यांच्याकडे सोपवण्याचे आदेश काढले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यास आपले प्रथम प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संभाजीनगर हे मराठवाड्याची औद्योगिक व आर्थिंक राजधानी आहे. येथील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास विशेषत: जनतेच्या मनात सूरक्षितेची भावना निर्माण करण्यास प्रथम प्राधान्य राहील, तसेच भ्रष्टाचार,स्ट्रीट क्राईम जातीय हिंसाचार यांच्या विरोधात आपली झिरो टोलरन्सची भूमिका असेल, विद्यार्थी महिला सुरक्षेसह शहरांच्या औद्योगिक प्रगतीला चालना मिळावी असेही आपले प्रयत्न राहतील असेही ते म्हणाले.

आयपीएस अधिकारी संदीप पाटील यांची मागील काही महिन्यांपूर्वीच गडचिरोलीच्या नक्षल विरोधी मोहिमेच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी नियुक्ती झाली होती. मूळचे सांगली जिल्ह्यातील आहेत. ते 2006 मधील आयपीएस अधिकारी आहेत. त्यांचे शिक्षण सातारच्या सैनिकी स्कूलमध्ये झाले इस्लामपूर येथून अभियांत्रिकांचे शिक्षण घेवुन त्यांनी दिल्लीत युपीएससी ची तयारी केली होती. त्यांची पहिली पोस्टिंग चंद्रपूर त्यानंतर खामगांव गडचिरोली सातारा पुणे ग्रामीण येथे त्यांनी आपली सेवा दिली. आयपीएस अधिकारी संदीप पाटील यांची महाराष्ट्रांच्या पोलीस खात्यात दबंग आणि शिस्तप्रिय पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.