पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दल सज्ज
ठिकठिकाणी तगडा बंदोबस्त : पोलीस अधीक्षक पंकज देशमुख
संभाजी पुरीगोसावी
पुणे : खरा पंचनामा
दरवर्षी प्रमाणे यंदाच्याही वारीला आळंदी आणि देहू येथून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा लाखों भाविकांच्या उपस्थित पार पडणार आहे. पुणे जिल्ह्यातील दोन मानाच्या पालख्या सासवडमधून निघत असतात, त्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने त्याची पूर्ण तयारी केली आहे, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे.
ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वाहतुकीत अनेक मार्गावर बदल करण्यात आला आहे. याची माहिती मिळविण्यासाठी लिंक तयार करण्यात आली आहे. उपलब्ध पर्यायी मार्गाची माहिती तसेच वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या सोयी सुविधांची माहिती या मधून मिळणार आहे. पालखी सोहळ्याच्या कालावधीत वाहनधारकांनी देखील पर्याय मार्गाचा वापर करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुण्यातील संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी पुणेकर देखील सज्ज झाले आहेत. हा सोहळा सुरळीत पार पडावा यासाठी पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त ठेवला आहे. पालखी मार्गावर कोणताही अपघात घडू नये, वाहतूक समस्या निर्माण होऊ नये तसेच अनुचित प्रकार घडू नये याकरिता पुणे ग्रामीण पोलीस प्रशासन सज्ज असणार आहे. पोलीस प्रशासनातर्फे 1200 पोलीस कर्मचारी, आणि 120 पोलीस अधिकारी,1000 होमगार्ड असा बंदोबस्त तैनात असणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.