महिलेसोबत नको ते कांड; अधिकाऱ्याचा झाला हवालदार
लखनऊ : खरा पंचनामा
कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कानपूरमधील एका हॉटेलच्या रुममध्ये एका महिला कॉन्स्टेबलसोबत रात्रीच्यावेळी उन्नावच्या बीघापूरचे पोलीस उपनिरीक्षक कृपा शंकर कनौजिया यांना रंगेहात पकडण्यात आलं होतं, त्यानंतर त्यांच्यावर आता कारवाई करण्यात आली आहे.
त्यांना पोलीस उपनिरीक्षक पदावरून हटवण्यात आलं असून, हवालदार बनवण्यात आलं आहे. ही घटना जुलै 2021 मध्ये घडली होती. कृपा शंकर यांनी सुट्टीसाठी अर्ज केला होता, त्यानंतर ते गायब झाले.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, उन्नावच्या बीघापूरचे पोलीस उपनिरीक्षक यांनी कौटुंबीक कारण सांगत सुट्टीसाठी अर्ज केला. सुट्टी मंजूर झाल्यानंतर ते गायब झाले. मात्र ते घरी परतले नसल्यानं त्यांच्या पत्नीला शंका आली. कनैजिया यांच्या पत्नीनं पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्या पतीचा शोध घ्यावा अशी विनंती केली. पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे कनौजिया यांचा शोध घेण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या मोबाईलचं लोकेशन कानपूरमधील एका हॉटेलमध्ये आढळून आलं.
ज्या हॉटेलमध्ये कनौजिया यांच्या मोबाईलचं लोकेशन सापडलं तिथे पोलिसांनी छापा टाकला, समोर जे दिसलं ते पाहून पोलिसांना धक्काच बसला. कनैजिया यांना त्या हॉटेलमधून एका महिला हवालदारासोबत रंगेहात पकडण्यात आलं. जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण घटनेची चौकशी केली त्यामध्ये असं आढळून आलं की या पोलीस उपनिरीक्षकानं कौटुंबीक कारण सांगून सुट्टी घेतली होती, मात्र तो कानपूरमधील एका हॉटेलमध्ये महिला शिपायासोबत सापडला. त्यानंतर तीन वर्ष हा खटला चालला. अखेर या पोलीस उपनिरीक्षकाला आता हवालदार करण्यात आलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.