मुलांच्या भांडणावरून पत्नीने पतीला डोक्याला मोबाइल फेकून मारला
मंगळवेढा : खरा पंचनामा
मुलांना भांडण करू नका, असे म्हणाल्याचा राग आल्याने शिक्षक पतीच्या डोक्यात मोबाइल ने मारहाण करून त्यास जखमी केले, तसेच शिवीगाळ करून दमदाटी केल्याची घटना शनिवारी घडली आहे. याबाबत पत्नीविरोधात शिक्षक पतीने शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत इसबावी-पंढरपूर येथे राहणारे फिर्यादी प्रेमचंद फुलचंद हतागळे हे शिरभावी (ता. सांगोला) येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. २२ जून रोजी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांची मुले भांडणं करीत असताना हातागळे यांनी त्यांना भांडू नका असे सांगितले.
याचा त्यांच्या पत्नीस राग आला. तिने मोबाईल पतीच्या डोक्यात मारला. त्यामुळे त्यांना दुखापत झाली. तसेच शिवीगाळी करून दमदाटी केली. त्यानंतर हातागळे यांनी शहर पोलिसात जाऊन फिर्याद दिली आहे
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.