Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

स्मृती इराणींच्या पराभवानंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल

स्मृती इराणींच्या पराभवानंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरलमुंबई : खरा पंचनामा


लोकसभा निवडणूक २०२४ चे निकाल आज जाहीर झाले. ५४२ जागांसाठी मतमोजणी पार पडली. लोकसभा निवडणूक निकालातील आतापर्यंतचे कल पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. उत्तरप्रदेशच्या निकालाने अनेकांना चकीत केलं आहे.


काँग्रेसचे किशोरीलाल शर्मा यांनी अमेठीच्या जागेवर स्मृती इराणी यांचा पराभव करून संपूर्ण देशाला चकित केले. स्मृती यांचा पराभव राहुल यांच्या मागील पराभवापेक्षा मोठा आहे. जवळपास लाखोंच्या मतांनी स्मृती ईराणी यांचं हे आव्हान शमलं आहे.

स्मृती इराणी यांनी २०१४ मध्ये पहिल्यांदा अमेठी मतदरासंघातून निवडणूक लढवली होती. त्यानंतर २०१९ मध्ये स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा अमेठी मतदारसंघातून पराभव केला होता. अमेठी हे उत्तर प्रदेशातील प्रमुख शहर आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे. उत्तर प्रदेशमधील ८० मतदारसंघांपैकी अमेठी आणि रायबरेलीतील निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे विशेष लक्ष होते. हे दोन्ही मतदारसंघ गांधी-नेहरु घराण्याचे पारंपारिक मतदारसंघ मानले जातात. अमेठीमधून यावेळी काँग्रेस नेते किशोरी लाल शर्मा यांना भाजपाच्या उमेदवार स्मृती इराणी यांच्याविरोधात उभे करण्यात आले होते. दरम्यान काँग्रेसच्या किशोरी लाल शर्मा यांनी प्रचंड मताधिक्याने हा विजय मिळवला आहे. आता स्मृती इराणी यांच्या पराभवानंतर सोशल मिडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. पराभवामुळे त्यांना सोशल मिडियावर ट्रोल केलं जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.