Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील २६ निरीक्षक, ४०६ उपनिरीक्षकांच्या बदल्या

राज्यातील २६ निरीक्षक, ४०६ उपनिरीक्षकांच्या बदल्या



मुंबई : खरा पंचनामा

राज्यातील राखीव आणि वायरलेस विभागातील २६ निरीक्षक तर ४०६ पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अपर पोलिस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांच्या सहीने मंगळवारी बदल्यांचे हे आदेश काढण्यात आले आहेत. यातील ९६ उपनिरीक्षकांच्या विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. तर काहीजणांना मुदतवाढही देण्यात आली आहे. 

राखीव पोलिस निरीक्षक असणाऱ्या १३ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यातील एकाला मुदतवाढ देण्यात आली आहे. वायरलेस (अभियांत्रिकी) या विभागातील १३ निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यातील ६ जणांना मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये सांगलीतील निरीक्षक रियाज शेख यांची सातारा येथे बदली करण्यात आली आहे. 

ऱाखीव उपनिरीक्षक असणाऱ्या ७ जणांची बदली करण्यात असून दोघांना मुदतवाढ देण्यात आली आहे. श्वान पथकातील ३ उपनिरीक्षकांची बदली झाली असून एकाला मुदतवाढ देण्यात आली आहे. वाहतूक विभागातील वायरलेसमधील एका उपनिरीक्षकाची बदली करण्यात आली असून चौघांना मुदतवाढ देण्यात आली आहे. राखीव उपनिरीक्षकांमध्ये १० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ९६ उपनिरीक्षकांच्या विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. २७५ उपनिरीक्षकांचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 

बदली झालेले अधिकारी कंसात कोठून कोठे बदली : प्रकाश उमाप (सातारा ते नाशिक शहर), शिरीष शिंदे (सांगली ते लोहमार्ग पुणे), महेश कदम (कोल्हापूर ते पीटीसी खंडाळा), सचिन मद्वाण्णा (सांगली ते कोकण परिक्षेत्र), दीपाली शिंदे (कोल्हापूर ते सीआयडी), नितीश पोटे (सातारा ते गडचिरोली), पोलिस निरीक्षक बाळू आलदर (सातारा ते सांगली), राजू शिंदे (पीटीसी तुरची ते सातारा).

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.